बुलडाणा अर्बन पतसंस्थेत आयकर विभागाची झाडाझडती सुरुच, अशोक चव्हाण रडारवर?

| Updated on: Oct 29, 2021 | 9:14 AM

सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आयकर विभागाने मागील दोन दिवसांपासून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. 27 ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरु आहे.

बुलडाणा अर्बन पतसंस्थेत आयकर विभागाची झाडाझडती सुरुच, अशोक चव्हाण रडारवर?
बुलडाणा अर्बन पतसंस्थेत आयकरची झाडाझडती
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभागाची झाडाझडती दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरुच आहे. मागील दोन दिवसांपासून मोठा पोलीस बंदोबस्त असून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्याशी निगडित साखर कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आयकर विभागाने मागील दोन दिवसांपासून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. 27 ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरु आहे. महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात ही तपासणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे आयकरच्या रडारवर असलयाचे दिसते.

बुलडाणा अर्बनची पाच राज्यांत व्याप्ती

बुलडाणा अर्बन ही पतसंस्था बरीच मोठी असून 5 राज्यात 465 शाखांचा कारभार चालतो. पतसंस्थेने 10 हजार ठेवींचा विक्रम पार केला असून 600 च्या वर वेअर हाऊस आहेत आणि पाच कर्मचारी काम करतात.

बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत सुरु असलेल्या झाडाझडतीमुळे सध्या सहकार क्षेत्राला हादरा बसला आहे. आता चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कारभाराविषयी आयकर विभागाकडे अनेक तक्रारी 

गेल्या काही दिवसांपासून या पतसंस्थेच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी आयकर विभागाकडे दाखल झाल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. तर अशोक चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्यातील बुलडाणा अर्बनने चार साखर कारखान्यांना कर्ज दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांचीही तपासणी सुरु असल्याची माहिती आहे. त्या अनुषंगानेच बुलढाणा अर्बनच्या मुख्य शाखेवर आयकर विभागाने आपला तळ ठोकला. त्यामुळे आता आयकरच्या चौकशीत काय समोर येते, हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे! राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या महत्वाच्या मागण्या मान्य

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली