शेगाव-आकोट मार्गावर नदीच्या पुलावरून पडून दुचाकीस्वार जागीच ठार, पुलाला कठडे नसल्याने घडली घटना..

| Updated on: Dec 22, 2021 | 10:43 AM

बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीच्या पुलावर मागील वर्षभरात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपनाचा फटका वाहन चालकांना बसत आहे. या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

शेगाव-आकोट मार्गावर नदीच्या पुलावरून पडून दुचाकीस्वार जागीच ठार, पुलाला कठडे नसल्याने घडली घटना..
नदीच्या पुलावरून पडून दुचाकीस्वार ठार
Follow us on

मुंबई : बुलढाणा (Buldhana) आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीच्या पुलावर मागील वर्षभरात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपनाचा फटका वाहन चालकांना बसत आहे. या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. रात्री पुलावरून दुचाकीस्वार पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.

पुलाला कठडे नसल्याने घडली घटना

अपघातातील मृत व्यक्तीचे नाव शेख राजीक शेख अमीर (वय 36) आहे. अकोला जिल्ह्यातील हाता या गावातील हा व्यक्ती रहिवाशी होता. अकोट या राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव जवळील मन नदीच्या पुलावर नवीन पुलाचे बांधकाम मागील वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरु आहे. या पुलावर आतापर्यंत चार वेळा मोठे अपघात घडले आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप लोकांचा आहे.

टँकर आणि मोटारसायकलचा अपघात

काही दिवसांपूर्णी बुलढाणा तालुक्यात टँकर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले होते. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात ही घटना घडली होती.

महत्वाच्या बातम्या : 

Girl committed suicide| शिक्षणासाठी वडिलांनी थांबवल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडीमारत केली आत्महत्या

वाळू चोरी करताना ट्रॉली उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर