बुलढाण्यात पावसाचं थैमान, जीव वाचवण्यासाठी दोरीचा उपयोग, विचलित करणारी दृश्य

| Updated on: Jul 22, 2023 | 5:46 PM

बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड पाऊस कोसळतोय. त्यामुळे पांडव नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. अनेकजण या पुरात अडकले. यावेळी एनडीआरएफच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचवले आहे.

बुलढाण्यात पावसाचं थैमान, जीव वाचवण्यासाठी दोरीचा उपयोग, विचलित करणारी दृश्य
Follow us on

बुलढाणा | 22 जुलै 2023 : बुलढाण्यात पावसाचं प्रचंड थैमान सुरु आहे. त्यामुळे पांडव नदीला पूर आलाय. नदीचं पाणी काही गावांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. विशेष म्हणजे पावसादरम्यानचा बुलढाण्यातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. या व्हिडीओ कदाचित आपल्याला विचलित करु शकतो. कारण जीव वाचवण्यासाठी इथे नागरीक दोरीच्या सहाय्याने नाला ओलांडत आहे. गावकरी ज्या नाल्याला ओलांडत आहेत त्याला प्रचंड थरार आहे. पण तरीही नाईलाजाने नागरिकांना दोरीच्या सहाय्याने प्रवास करावा लागत आहे.

बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. बुलढाण्यातील काथर गावात 100 पेक्षा जास्त गावकरी अडकली होती. तर बावनबीर गावात पाणी शिरलं आहे. पुराच्या पाण्यामुळे बावनवीर ते टुणकी असा रस्ता बंद करण्यात आला आहे. केदार नदीला पूर आल्याने बावनबीर गावात पाणी शिरलं आहे. घराघरांत पाणी शिरलं आहे. मंदिरात पाणी शिरलं आहे. तसेच दुकानांमध्ये पाणीही शिरलं आहे.

तेलखेडे येथे दोरीच्या मदतीने जीवघेणा प्रवास

दुसरीकडे बुलढाण्या जिल्ह्यातील तेलखेड गावातील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या गावात नाला ओलांडण्यासाठी तब्बल दोरीचा उपयोग करुन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दोरीवरचा हात सुटला तर या नाल्यातून वाहून जाण्याची भीती आहे. याशिवाय नाल्यालादेखील जोरदार प्रवाह आहे. नाल्याचं पाणी प्रचंड वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दोरी तुटली किंवा हात सुटला तर हे खूप जीवघेणं ठरु शकतं.

सोनाला गावात पुराचं पाणी

मुसळधार पावसामुळे संग्रापुरातल्या सोनाला गावात पुराचं पाणी शिरलं आहे. संग्रामपूर, जळगाव जामोद येथील शेती पाण्याखाली गेली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील ठप्प झालीय. गावात कंबरेपर्यंत पाणी आहे. स्थानिकांकडून बचावकार्य सुरु आहे.

सोनाला गावातील परिस्थिती अतिशय भयानक आहे. नदीकाठची घरी पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. याशिवाय जनावरांना वाचवणं देखील आता प्रशासनापुढील आव्हान आहे.

सोनाला गावात शेताचं प्रचंड नुकसान झालंय. सोनाला गावात शेतीला तणावाचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. अनेक गावकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. प्रशासन त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होतं. पण प्रशासन गावापर्यंत पोहोचू शकत नव्हतं.

जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात 100 नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. या गावकऱ्यांना बाहेर काढणं फार महत्त्वाचं होतं. पण प्रशासनदेखील हतबल झालं होतं. पांडव नदीच्या पाणी कमी होत नाही तोपर्यंत प्रशासनाला काहीच हालचाली करता येणार नाहीत, अशी परिस्थिती होती. पण एनडीआरएफच्या जवानांनी यशस्वीपणे 135 जणांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. काथरगाव येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. प्रशासनने नागरिकांची सर्व व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे.