Buldana School : नालीचे घाण पाणी घुसले शाळेच्या आवारात, विद्यार्थ्यांना त्रास, चिखली नगरपालिकेसह भोगावती ग्रामपंचायतीने केले हात वर

| Updated on: Jul 09, 2022 | 3:29 PM

या घाणपाण्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मात्र या ठिकाणी पोषण आहार शिजवला जात असल्याने त्या खोलीत ही घाण पाणी घुसले. या पाण्याचा घाण वास येत असल्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाना शाळेत बसणेसुद्धा अवघड झालेय.

Buldana School : नालीचे घाण पाणी घुसले शाळेच्या आवारात, विद्यार्थ्यांना त्रास, चिखली नगरपालिकेसह भोगावती ग्रामपंचायतीने केले हात वर
नालीचे घाण पाणी घुसले शाळेच्या आवारात
Follow us on

बुलडाणा : चिखली नगरपालिकेच्या शाळेच्या आवारात शेजारील नालीचे घाण पाणी घुसले. शाळेतील विद्यार्थ्यांना या घाण पाण्याचा त्रास होतोय. आज शाळेत जातानासुद्धा विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात (Health endangered) आलेय. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली नगरपालिकाची सैलानी नगर (Sailani Nagar) येथे शाळा आहे. या शाळेच्या शेजारीच भोगावती ग्रामपंचायतीने (Bhogawati Gram Panchayat) काही दिवसापूर्वी नाली खोदून टाकली आहे. मात्र त्याचे बांधकाम अद्यापही पूर्ण केले नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह चिखली परिसरात पाऊस सुरू आहे. या सैलानी नगरातील सांडपाणी सुद्धा याच नालीमधून वाहते. मात्र नाली खोदलेली असल्याने आणि काम अर्धवट राहिल्याने या नालीतील सांडपाणी थेट नगर पालिकेच्या शाळेच्या आवारात घुसले.

विद्यार्थी, शिक्षकांना अडचण

या घाणपाण्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मात्र या ठिकाणी पोषण आहार शिजवला जात असल्याने त्या खोलीत ही घाण पाणी घुसले. या पाण्याचा घाण वास येत असल्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाना शाळेत बसणेसुद्धा अवघड झालेय. या भोंगळ कारभार विरोधात पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली. नालीच्या सांडपाण्याची व्यवस्था लावावी, अशी मागणी केलीय. भोगावती ग्रामपंचायत म्हणते शाळा नगर पालिकेची आहे. नगर पालिका म्हणते शाळा भोगावती ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. या दोन्ही संस्थांने हात वर केल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना मात्र त्रास सहन करावा लागतोय.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका

ही शाळा कुणाच्या हद्दीत आहे. यावरून हा वाद आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका हद्दीचा प्रश्न आहे. अशावेळी दोघांनी मिळून स्वच्छतेसाठी मदत केल्यास शाळा स्वच्छ होऊ शकते. उद्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकही कामगारांचा वापर करून शाळेची स्वच्छता करू शकतात. एकदुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा स्वतः पुढाकार घेण्याची गरज आहे. पण, पुढाकार घेणार कोण? यासाठी हे घोडं अडलं आहे.

हे सुद्धा वाचा