सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या मुलावर गुन्हा दाखल होणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेटवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दुग्धव्यवसाय आयुक्तांना देण्यात आले आहेत. राज्याचे अवर सचिव राजेश गोविल यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत. देशमुखांचे पुत्र रोहन देशमुख लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन आहेत. चेअरमन म्हणून रोहन देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दूधभुकटीच्या विस्तारीकरणासाठी सरकारकडे दिलेले […]

सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या मुलावर गुन्हा दाखल होणार
Follow us on

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेटवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दुग्धव्यवसाय आयुक्तांना देण्यात आले आहेत. राज्याचे अवर सचिव राजेश गोविल यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत. देशमुखांचे पुत्र रोहन देशमुख लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन आहेत. चेअरमन म्हणून रोहन देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दूधभुकटीच्या विस्तारीकरणासाठी सरकारकडे दिलेले कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलं होतं. तक्रारीच्या चौकशीनंतर सरकारने 24 कोटी 81 लाखांचा मंजूर केलेला प्रकल्प रद्द केला होता. मंजूर केलेले पाच कोटी रुपयेही सरकारने परत घेतले होते. प्रस्तावात सादर कागदपत्रे बनावट असल्याचं उघड झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्हच्या वतीने राज्याच्या दुग्ध विकासाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्यात लोकमंगलकडे असलेल्या दुग्धशाळेचा विस्तार म्हणून 50 हजार लिटरवरून एक लाख लिटर दूध करण्याचा प्रस्ताव होता. सोबत 10 मेट्रिक टन दूधभुकटी निर्मिती प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार होती. त्यासाठी सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावासोबत विविध परवाने, लोकमंगल दूध संस्थेतील संकलन याबाबतची कागदपत्रे जोडली होती.

एकूण 24 कोटी 81 लाख रुपयांचा हा प्रस्ताव  होता. शासकीय स्तरावर हा प्रस्ताव मंजूर होऊन दोन टप्प्यात पाच कोटी रुपयांचे अनुदानही अदा करण्यात आले. मात्र, दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पाराव कोरे यांनी माहितीच्या अधिकारात प्रस्तावातील कागदपत्रे मिळवली.

सरकारकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बनाव झाल्याचा प्रकार त्यातून उघडकीस आला. ही बाब त्यांनी दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लोकमंगलला मंजूर झालेली रक्कम अदा न करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कोरे यांच्या तक्रारींवर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय खात्याच्या प्रधान सचिवांनी सुनावणी ठेवली. लोकमंगल मल्टिस्टेटचे म्हणणे घेतले. त्यानंतर सकृतदर्शनी कागदपत्रात बनाव झाल्याचं समोर आलंय.

या प्रकरणाची कुणी दाद घेत नसल्यामुळे तक्रारदार कोरे यांनी लोकायुक्तांकडे अधिकारी, सचिव आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्या विरोधात तक्रार केली होती.  त्यामुळे आज मंत्री महादेव जानकर आणि सर्व अधिकारी सुनावणीसाठी हजार होते. या सर्वांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं.