राज्य चालवायच्या दोन पद्धती, पहिलं म्हणजे सारखं काम करायचं, दुसरं समाज अस्वस्थ ठेवायचा: चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 20, 2021 | 9:21 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (20 जानेवारी) राज्य सरकारवर सडकून टीका केली (Chandrakant Patil slams Nitin Raut).

राज्य चालवायच्या दोन पद्धती, पहिलं म्हणजे सारखं काम करायचं, दुसरं समाज अस्वस्थ ठेवायचा: चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (20 जानेवारी) राज्य सरकारवर सडकून टीका केली. “राज्य चालवण्याच्या दोन पद्धती असतात. एक पद्धत म्हणजे खूप लोकांच्या तक्रारी ऐकायच्या, त्यावर सोल्यूशन काढायचं, सारखं काम करायचं. दुसरी पद्धत म्हणजे समाज सारखा अस्वस्थ ठेवायचा म्हणजे तो भांडायलाच येत नाही. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध एससी, एससी विरुद्ध एसटी, एसटी विरुद्ध धनगर, असे सारखे वाद निर्माण करायचे”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil slams Nitin Raut).

“स्वत:च्या खूर्चीसाठी सारखे वाद करायचे, समाजाते स्वास्थ बघिडलं तर बिघडू दे, अशा भूमिकेतून हे सर्व चाललं आहे. तुम्हाला सरकार मिळालंय, सरकार चालवा. समाजाचं स्वास्थ बिघडवणं, समाजाची ही घट्ट वीण संत-महंतांनी निर्माण केली आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil slams Nitin Raut).

“या सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नाही. ते न देण्याची कारणंदेखील मी अनेकदा सांगितली आहेत. काही मंत्र्यांना आपल्या नावापुढे ओबीसी लावून घ्यायचं नाही. एकदा त्या जातीला ओबीसी कॅटेगरीत टाकलं की मग तुम्हाला सवलती हव्याात नको हव्यात, तरी तो ओबीसीचा होतो. सातत्याने आम्ही पुढारलेले आहोत. आम्ही गाव चालवणारे आहोत. गावातल्या लोकांना देणारे आहोत. आता आम्ही घेणारे कसे होणार? अशा प्रकारची सगळी मानसिकता आहे. त्यामुळे मराठा समाजाला काँग्रेस काळात आरक्षण दिलं गेलं नाही, आज हे आरक्षण टिकवण्याबाबतही बोंबाबोंब आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“आज एमपीएससीने न्यायालयात अर्ज दिलाय, आम्हाला नोकरभरतीत एसबीसी वर्ग काढण्याची परवानगी द्या, असं अर्जात म्हटलं आहे. काय चाललंय काय? काय म्हणाचं ते सुप्रीम कोर्टाला म्हणू द्या ना”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा’

“ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घ्यायची नसेल, मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं सोपवावं. जर आपल्याला मंत्रीपदाचे सर्व अधिकार हवे असतील तर यातनाही सहन करायच्या असतात. नितीन राऊत अशाप्रकारे जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे पैसे मागितले पाहिजे. पण तसं तुम्ही काही करणार नाहीत. याउलट मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी सोपवणं चालणार नाही”, अशी सडेतोड प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

“कोरोना संकट काळात लोकांची आलेली बिलं ही अंदाजे आलेली बिलं आहेत. मागच्या बिलांची सरासरी काढून आलेली बिलं आहेत. नितीन राऊत यांचा जो दावा आहे, कोरोना काळात लोकांनी खूप वीज वापरली तो चुकीचा आहे. कोरोना काळात घरामध्ये एसी आणि पंखा वापरण्याची भीती होती. मग लोकांनी टीव्ही पाहिला. टीव्हीचं इतकं बिल येतं का? तुमची मानसं त्या त्या महिन्याचं मीटरचं रिडींग घेऊ शकली नाहीत. तुम्ही आधीच्या आलेल्या बिलांच्या आधारे बिल देऊ शकत नाही. तुम्ही विजेच्या बिलात तरी दिलासा द्यायला हवा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा : नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन