चंद्रपूरातील ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; भरदुपारी हल्ला; नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

| Updated on: Jun 12, 2022 | 9:44 PM

राजेंद्र हा सरपन गोळा करण्यासाठी गावाला लागून असलेल्या जंगल परिसरात गेले होते. लाकडे आणण्यासाठी ज्या जंगल परिसरात ते गेले होते, ते जाण्याआधीच झुडपात वाघ दबा धरून बसला होता. वाघाला पाहता क्षणीच राजेंद्र यांनी आरडाओरड केला मात्र राजेंद्र यांच्यावर हल्ला करुन त्यांचा नरडीचा घोट घेत वाघाने त्यांना ठार केले.

चंद्रपूरातील ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; भरदुपारी हल्ला; नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
संग्रहित छायाचित्र
Image Credit source: google image
Follow us on

चंद्रपूरः ब्रह्मपुरी तालुक्यातील (Brahmapuri taluka) दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या हळदा (Halda) गावाशेजारील जंगल परिसरात सरपनासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला (Tiger Attack) करून ठार केल्याची घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळज उडाली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव राजेंद्र अर्जुन कांबळे (वय 47, रा. हळदा) असे आहे. दुपारच्या वेळेला गावाला लागूनच असलेल्या जंगल परिसरात जळणासाठी लाकडे आणण्यासाठी गेले होते.

त्यावेळी वाघाकडून हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून वन विभागाकडून त्यांचा पंचनामा करण्यात आला.

गावाशेजारी असलेल्या जंगलात हल्ला

मृतक राजेंद्र हा सरपन गोळा करण्यासाठी गावाला लागून असलेल्या जंगल परिसरात गेले होते. लाकडे आणण्यासाठी ज्या जंगल परिसरात ते गेले होते, ते जाण्याआधीच झुडपात वाघ दबा धरून बसला होता. वाघाला पाहता क्षणीच राजेंद्र यांनी आरडाओरड केला मात्र राजेंद्र यांच्यावर हल्ला करुन त्यांचा नरडीचा घोट घेत वाघाने त्यांना ठार केले.

लोकांचा आरडाओरड आणि वाघाची धूम

यावेळी राजेंद्र यांच्यासोबत काही जण गेले होते, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर मात्र वाघाने तिथून वाघाने तिथून पळ काढला. या घटनेची माहिती वनविभाग व पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

राजेंद्र कांबळे यांच्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राजेंद्र यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळ्ला होता. त्यांच्या मृत्यूमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.