‘एअरबस’ प्रकल्प गुजरातऐवजी महाराष्ट्रातील “कोणत्या” शहरात होण्याची शक्यता होती, टाटांना कुणी लिहिलं होतं पत्र…

| Updated on: Oct 28, 2022 | 6:14 PM

राज्यात येणारे प्रकल्प एकापाठोपाठ एकेक प्रकल्प गुजरातला जात आहे. ही गंभीर बाब असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.

एअरबस प्रकल्प गुजरातऐवजी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात होण्याची शक्यता होती, टाटांना कुणी लिहिलं होतं पत्र...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : शिंदे सरकार आल्यानंतर राज्यातील दूसरा प्रकल्प हा गुजरात येथे गेला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर टाटा एयरबस हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी यांनी टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना पत्र लिहिले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. टाटा एयर बस हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय आरोप होत असतांना छगन भुजबळ यांनी म्हंटलंय, एअरबस प्रोजेक्टचं काम टाटा ग्रुपला मिळाल्यानंतर मी तेव्हा त्यांना पत्र पाठवलं होतं, हा प्रकल्प नाशिकमध्ये व्हावा, अशी मागणी मी पत्राद्वारे केली होती असे भुजबळ म्हणाले आहे. याशिवाय वेदांता-फॉक्सकॉन नंतर टाटा एयर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात येणारे प्रकल्प एकापाठोपाठ एकेक प्रकल्प गुजरातला जात आहे. ही गंभीर बाब असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत वजन आहे. त्यांनी असे प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मतही भुजबळांनी व्यक्त केले आहे.

आपल्या युवकांनी फक्त दहिहंडी, आरत्या, हनुमान चालिसा, फटाके, यातच गुंतून रहायचं का? निदान यापुढे तरी फडणवीसांनी प्रयत्न करायला हवेत असे म्हणत भुजबळांनी फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, टाटा समूहाच्या प्रमुखांना भाजपचे नितीन गडकरी यांनी देखील एक पत्र लिहिले होते. त्यानंतर भुजबळ यांनी प्रकल्प नाशिकमध्ये यावा यासाठी पत्र लिहिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान टाटा एयर बसचा प्रकल्प गुजरात ला गेल्याने भाजपने ट्विटवरुन महाविकास आघाडीवर निशाण साधला आहे.

यामध्ये म्हंटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी माघायला हवी अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.