राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 6,910 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 7,510 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,00,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,593 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 21 2021 Daily City District Wise Covid 20 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
दुसऱ्या लाटेमध्ये जे मृत्यू झाले आहेत ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले नाहीत, असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. आपण ऑक्सिजन बाबतीत जागरूक असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
– कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद
– जिल्ह्यात तब्बल 17 लाखा हुन अधिक नागरिकांच झालं लसीकरण
– पहिला डोस – 13 लाख 2 हजार 397 नागरिकांनी घेतला
– दुसरा डोस – 3 लाख 98 हजार 101 नागरिकांनी घेतला
– ग्रामीण भागात ही लसीकरनाला वेग
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींचा ठणठणाट
औरंगाबाद शहरातील सर्वच लसीकरण केंद्र राहणार बंद
लस टंचाई मुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील 20 लाख नागरिक वेटिंगवर
तर तब्बल 61 हजार नागरिकांची दुसऱ्या डोस साठी उडतेय तारांबळ
लस मिळत नसल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक हवालदिल
सोलापूर –
चार दिवसांपासून लसीकरण मोहिम ठप्प
लसीकरण केंद्रावर लसीसाठी येरझारे
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
तर 3 हजार 998 रुग्णांना प्राण गमवावे लागले
कालच्या दिवसात देशात 36 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
India reports 42,015 new #COVID19 cases, 36,977 recoveries, and 3,998 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry. Daily positivity rate at 2.27%, less than 3% for 30 consecutive days. pic.twitter.com/uDhIYgKOUn
— ANI (@ANI) July 21, 2021
सोलापूर – 24 तासात ग्रामीणमध्ये 638 जणांचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह
तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू
ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा 1 लाख 42 हजार 681 वर
तर आत्तापर्यंत 3 हजार 70 जणांचा मृत्यू
3 हजार 161 सक्रिय रुग्णावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
कोरोना बरोबरच म्युकरमायकोसिसच्या 48 रुग्णांवर उपचार सुरू
तर 24 तासात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
आत्तापर्यंत म्युकर मायकोसिसने 85 जणांचा मृत्यू
औरंगाबाद :-
औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 10 लाख 28 हजार 378 जणांचे झाले लसीकरण
पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या पोचली 10 लाखावर
टंचाई काळातही लसीकरण मोहिमेत औरंगाबाद जिल्ह्याने घेतली आघाडी
तिसरी लाट रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा लसीकरणातून झाला सज्ज
10 लाखांच्या वर लसीकरण होऊनही औरंगाबाद जिल्ह्यात कमालीची लस टंचाई
आणखी 20 लाख नागरिक लसींच्या प्रतीक्षेत
वसई विरार महापालिका हद्दीत आज दिवसभरासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.
महापालिका हद्दीत 16 जुलै पर्यंत 2 लाख 95 हजार 992 जणांनी लसीकर घेतले आहे. यातील 2 लाख 25 हजार 811 जणांनी पहिला डोस तर 65 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
जस जसा लसीचा साठा उपलब्ध होतो तसे महापालिका लसीकरण केंद्रावर लस पुरवठा केल्या जाते. काल लसीकरणाचा साठा शासनाकडून आला नसल्याने हे लसीकरण बंद ठेवले आहेत.
सोलापूर –
शहर जिल्ह्यासाठी आज दुपारी मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
उद्यापासून होणार लसीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात
जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून लसीचा पुरवठा झाला नाही
परिणाम म्हणून सर्व केंद्रावर लसीकरण मोहीम झाली आहे ठप्प
आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून आज दुपारी होणार लस प्राप्त
मात्र किती लसी मिळणार याबाबत स्पष्टता नाही
– नागपुरात आजारी वृद्धांचे आता घरीच होणार कोरोना लसीकरण
– नागपूर महानगरपालिका राबवणार विशेष मोहिम
– महानगरपालिकेचे पथक आजारी वृद्धाला घरी जाऊन देणार लस
– घरी वृद्धांच्या लसीकरणासाठी मनपाच्या लिंकवर नोंदणी आवश्यक
– नागपूरात कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी प्रयत्न
– नागपूर जिल्हयात 18 ते 44 वयोगटातील 13 टक्के तरुणांचं लसीकरण
– महिनाभरात 18 ते 44 वयोगटातील 5 लाख 45 जणांचं लसीकरण
– 21 जून ते 21 जुलै महिनाभरात एकूण डोस ची संख्या दुप्पट
– डेल्टा प्लसच्या पार्श्वभुमिवर लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं
राज्यात गेल्या 24 तासांत 6,910 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली
गेल्या 24 तासांत नवीन 7,510 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत
एकूण 60,00,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत
राज्यात एकूण 94,593 सक्रिय रुग्ण आहेत
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे
राज्यात आज 6,910 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7,510 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,00,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,593 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे. pic.twitter.com/jB4WA4AJVA
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 20, 2021