Nanded Mahashivratri 2022 | शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

| Updated on: Mar 01, 2022 | 4:04 PM

कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे बंद असलेल्या शिव मंदिरात (Shiv) आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झालीय. नांदेडमधल्या (Nanded) सगळ्याच महादेव मंदिरात आज भाविकांच्या रांगा दिसून आल्या.

Follow us on

कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे बंद असलेल्या शिव मंदिरात (Shiv) आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झालीय. कोरोनाचे निर्बंध आणि आता साथ आटोक्यात आल्याने भाविकांत देव दर्शनाचा उत्साह दिसून येत आहे. नांदेडमधल्या (Nanded) सगळ्याच महादेव मंदिरात आज भाविकांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे मंदिराबाहेर असणाऱ्या दुकानदारांचा व्यवसाय आता पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता सगळे निर्बंध हटल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केलाय. मागच्या साधारणपणे अडीच वर्षांपासून अनेक निर्बंध कोरोनामुळे राज्यात लागू होते. आता बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत आहे. आज महाशिवरात्रीनिमित्र नांदेडमधल्या विविध शिव मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन आधीच करण्यात आले होते.