पालघरमधून मोठी बातमी! पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद, कोरोनाची धास्ती!

| Updated on: Jan 06, 2022 | 7:27 PM

कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पालघरमधून मोठी बातमी! पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद, कोरोनाची धास्ती!
School
Follow us on

पालघर : पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद राहणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी कऱण्यात आले आहेत. कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कुठे कुठे बंद राहणार?

वसई-विरार शहर महानगर पालिका, पालघर आणि डहाणू नगर परिषद, कुडूस ग्रामपंचायत, बोईसर, सरावली, खैरापाडा, कुंभवी, पाम सालवड, पास्थळ, बेटे गाव, नवापूर कोलवडे, मान, या सर्व ग्राम पंचायतीच्या हद्दीतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद राहतील, असे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी काढले आहेत. वाढत्या कोरोनामुळे मुंबईसह ठाणे, पुणे, नवी मुंबई, पनवेल पाठोपाठ अनेक जिल्ह्यांत खबरादारीचे निर्णय घेतला जात आहे. किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ओमिक्रॉनच्या रुग्णवाढीची गती पाहता, लहानग्यांनामध्ये संसर्ग पसरु नये, यासाठी आता पालघर जिल्ह्यातही शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिकेनं शाळांबाबत निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता सर्वच जिल्ह्यातील जिल्ह्याधिकारी आणि स्थानिक प्रशासनकडून खबरदारीची पावलं उचलत कडक पावलं उचलली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी निर्बंध अधिक कठोर केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि रुग्णवाढ नियंत्रणात राहावी, यासाठी लोकांनीही प्रशासनानं लागू केलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन केलं जातंय.

दरम्यान, शाळांचे ऑफलाईन वर्ग जरी बंद राहणार असेल, तरी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथं ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत. फक्त ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांनी त्याप्रमाणे नियोजन करावं, असं आवाहन करण्यात येतंय.

आरोग्यमंत्र्यांचं सूचक विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा झाली.  या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी सूचक विधान केलंय. हॉटेल्स, मॉल्स बंद करणार का, असा प्रश्न विचारल्यास राजेश टोपे म्हणाले, की

आज मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरांमध्ये हळू हळू शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पण शाळा-कॉलेज बंद करून मुले हॉटेल्स, मॉल्समध्ये फिरणार असतील तर यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल.

इतर बातम्या –

कोरोनाचा कहर वाढला, वैद्यकीय विभागाच्या आजच्या बैठकीत काय निर्णय? वाचा सविस्तर

लोकल प्रवासावर निर्बंध आणणार?, गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली; कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता

दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान तयार