मेट्रो कारशेड तर बनवायची आहेच, पर्यायी जागेचा शोधही सुरु आहे : एकनाथ शिंदे

| Updated on: Dec 23, 2020 | 3:52 PM

मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं (Eknath Shinde on metro carshed).

मेट्रो कारशेड तर बनवायची आहेच, पर्यायी जागेचा शोधही सुरु आहे : एकनाथ शिंदे
eknath shinde
Follow us on

मुंबई : “मेट्रोचं काम जोमात सुरु आहे. कारशेडही (Metro Carshed) लवकर होणं जरुरीचं आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेड न्यायप्रविष्ट आहे. पण कारशेड लवकर बनवायची आहे त्यामुळे पर्यायी जागांचा शोध सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादावर देखील त्यांनी भाष्य केलं (Eknath Shinde on metro carshed).

“कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारची आहे की केंद्र सरकारची यावरच वाद सुरु झाला. हायकोर्टाने दुर्देवाने कांजूरमार्ग येथे बनणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचबरोबर बीकेसी जागेबाबत आढावा घेतला जात आहे, असंदेखील ते म्हणाले.

“कांजूरमार्ग कारशेड प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर आम्ही विचार करत आहोत. यामध्ये राजकारण आणण्याचं प्रयत्न होत आहे. कागदपत्री ही जागा महाराष्ट्र सरकारची असल्याचे दिसत आहे. विरोधकांनी सुद्धा सहकार्य करावे”, असं आवाहन त्यांनी केलं (Eknath Shinde on metro carshed).

एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत नाणार प्रकल्पावरदेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावरदेखील त्यांनी भूमिका मांडली. “नाणार प्रकल्प रद्द झाला आहे. नाणारला लोकांचा विरोध होता. शिवसेना लोकांबरोबर होती. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हते तेव्हा देखील त्यांनी त्याभागाचा दौरा केला होता. शिवसेना लोकांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्याय-हक्कासाठी लढत असते”, असं शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदेना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबतही प्रश्नन विचारण्यात आला. “महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि भविष्यातही कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकत्रित कार्यक्रम राबवू”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा :

शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

पराभूतांवर नवी जबाबदारी?, विधानसभा, लोकसभेतील पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक