शिंदे गटाचा दसरा मेळाव्याच्या संदर्भात उद्या नाशिकमध्ये बैठक, कोण-कोण राहणार उपस्थित…

| Updated on: Sep 23, 2022 | 8:58 PM

दसरा मेळाव्याबाबत लक्ष्मी लॉन्स येथे उद्या होणारी बैठक ही मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळाव्याच्या संदर्भात उद्या नाशिकमध्ये बैठक, कोण-कोण राहणार उपस्थित...
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे दसरा मेळावा घेण्यावर ठाम असल्याने त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला. 5 ऑक्टोबरला दसरा मेळावा (Dussehra gathering) होणार असल्याने विभागानुसार तयारी करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समोर आले आहे. मुंबईतील बीकेसी (BKC) येथील मैदानावर एकनाथ शिंदे ही दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती असल्याने शिंदे गटातील आमदार, पदाधिकारी तयारीला लागले आहे. नाशिकमधील शिंदे गटातील मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांची औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे दसरा मेळाव्याची बैठक पार पडणार आहे. त्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दसरा मेळाव्याबाबत लक्ष्मी लॉन्स येथे उद्या होणारी बैठक ही मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत शिवसेना उपनेते चिमणराव पाटील, तल म्हात्रे, रवींद्र फाटक, संध्याताई वढावकर यांची उपस्थिती राहणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमण्यात आलेले जिल्हा संपर्क प्रमुख संजय बच्छाव, आमदार सुहास कांदे यांची उपस्थिती राहणार आहे.

तर या बैठकीचे आयोजन खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, संजय दुसाने, महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे, महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के यांनी केले आहे.

दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाण्यासाठी वाहन व्यवस्था, चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था याशिवाय जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहे.

मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यावर नाशिक विभागाची जबाबदारी देण्यात आली असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला नेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.