गोव्यात फिरायला जा पण चुकूनही तिकडची दारु महाराष्ट्रात आणू नका नाही तर… शिंदे-फडणवीस सरकारने घेतलाय मोठा निर्णय

| Updated on: Oct 03, 2022 | 5:54 PM

कारण गोव्यात टॅक्स कमी असल्यामुळे दारु स्वस्त दरात मिळेत.

गोव्यात फिरायला जा पण चुकूनही तिकडची दारु महाराष्ट्रात आणू नका नाही तर... शिंदे-फडणवीस सरकारने घेतलाय मोठा निर्णय
Follow us on

सातारा : गोवा सर्वांचेच फेवरेस्ट टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक लोक खास दारुसाठी गोव्यात जातात. कारण गोव्यात  दारु स्वस्त दरात मिळेत. गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने महाराष्ट्र राज्यात दारू आणली जाते आहे. हा प्रकार रोखण्यासाठी चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्यांवर मोक्का लावणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Excise Minister Shambhuraj Desai ) यांनी सांगितले.

गोव्यातून महाराष्ट्रात दारु तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी शिंदे सरकारला मोक्का कायदा कळतो का असं ट्विट केले आहे. या बाबत शंभूराज देसाई यांना विचारल्यावर त्यांनी मी दिलेला बाईट सचिन सावंत यांनी नीट ऐकावा असा टोला लगावला.

तस्करी हे गैरकृत्य आहे .गोव्यातून आणलेली दारू राज्यात आणून विकली जाते त्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या दारू विक्री वर होतो.

उत्पादन घटते राज्याची आर्थिक हानी होते .आपल्या राज्याचा तिजोरीतला पैसा दुसऱ्या राज्यात जात असेल तर त्याला सचिन सावंत यांचे समर्थन आहे का असा सवाल शंभूराज देसाई यांनी सावंत यांना केला आहे?