म्हाडा पुणे मंडळ सोडतीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे नवी तारीख

| Updated on: Dec 16, 2021 | 1:42 PM

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या 4 हजार 222 सदनिकांच्या सोडतीसाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

म्हाडा पुणे मंडळ सोडतीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; ही आहे नवी तारीख
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या 4 हजार 222 सदनिकांच्या सोडतीसाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तारीख आता 22 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत सोडतीसाठी एकूण 52 हजार 928 जणांनी अर्ज भरले असून, त्यातील 32 हजार 553 जणांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. पुणे मंडळाची सोडत येत्या सात जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.

4 हजार 222 सदनिकांसाठी सोडत

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गंत 4 हजार 222 सदनिकांच्या सोडतीसाठी 16 नोव्हेंबर 2021 पासून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्याची म्हणजे 16 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता मुदतवाढ करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची ताऱीख 22 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे. म्हाडाच्या या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत असून, मिळणारा प्रतिसाद पाहता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

मुदतवाढीमुळे अर्जदारांना दिलासा

दरम्यान म्हाडाची ही सोडत पुण्यातील आगरकर नगर येथील मंडळाच्या कार्यालयात येत्या 7 जानेवारीला होणार आहे. म्हाडाकडून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक जण विविध कारणांमुळे वेळेत अर्ज भरू शकले नव्हते, अशा लोकांना आता म्हाडाच्या या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या 

प्रतीक्षा संपली! ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, पहिल्याच दिवशी शंभर वाहनांचे वितरण

Bank strike: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

Bank: तिढा खासगीकरणाचा: राष्ट्रीय बँक कर्मचारी संपावर, शिष्टाई अयशस्वी?