कोल्हापुरात राष्ट्रवादीला भगदाड, माजी खासदार मुलासह शिवसेनेत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आटोपताच राष्ट्रवादीला जिल्ह्यात उभी फूट पडली आहे. माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलाय. पवारांचा दौरा आटोपताच माने कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत […]

कोल्हापुरात राष्ट्रवादीला भगदाड, माजी खासदार मुलासह शिवसेनेत
Follow us on

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आटोपताच राष्ट्रवादीला जिल्ह्यात उभी फूट पडली आहे. माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलाय. पवारांचा दौरा आटोपताच माने कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. याबाबतचं पत्र शरद पवारांना पाठवण्यात आलं आहे. निवेदिता माने यांच्यासह त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनीही शिवसेनेचं धनुष्य हातात घेतलं आहे. ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कोण आहेत निवेदिता माने?

निवेदिता माने यांच्यासह माने कुटुंबीयांचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या दबदबा आहे. धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. माने कुटुंबीय ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच पक्षाला असा धक्का लागल्याने मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा फायदा स्वाभाविकपणे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी वाढवण्यात निवेदिता माने यांचं मोठं योगदान आहे. राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रत्येक सभेत त्यांची आवर्जून उपस्थिती असते. शिवाय महिला आघाडीतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एकीकडे माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे, तर दुसरीकडे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिकही भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या सतत येत असतात.

शरद पवारांचा कोल्हापूर दौरा आणि राष्ट्रवादीमधील फूट यामागे नेमकं काय राजकारण आहे, याचीही चर्चा सध्या कोल्हापुरात रंगली आहे. माने कुटुंबीयांना राष्ट्रवादीमध्ये डावललं जात होतं का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. माने यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.