गोंदियात महिलेला एकाच दिवशी दोन डोस, 11 दिवसानंतर प्रकृतीबाबत चकीत करणारी माहिती

| Updated on: May 29, 2021 | 12:55 PM

गोंदियात एका महिलेला एकाच दिवशी 10 मिनिटांच्या अंतराने कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस दिल्याचा दावा एका महिलेने केला होता. 

गोंदियात महिलेला एकाच दिवशी दोन डोस, 11 दिवसानंतर प्रकृतीबाबत चकीत करणारी माहिती
कोविशिल्डचा डोस घेतलेल्या भारतीयांचं ब्रिटनमधलं क्वारंटाईन बंद
Follow us on

गोंदिया : कोरोना संसर्गाला (Corna virus) आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लसीकरण (Corona vaccination) मोहीम सुरु आहे. लसींचा तुटवडा असला, तरी उपलब्ध साठ्यातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सध्या 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण बंद आहे. मात्र त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोव्हिशील्ड लसीच्या (covishield vaccine) एका डोसनंतर दुसरा डोस 6 ते 8 आठवड्याचं अंतर ठरवण्यात आलं आहे. मात्र तिकडे गोंदियात भलताच प्रकार घडला होता. (Gondia woman who claimed received two dose of covishield vaccine same time same day now her health condition is stable maharashtra update)

गोंदियात एका महिलेला एकाच दिवशी 10 मिनिटांच्या अंतराने कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस दिल्याचा दावा एका महिलेने केला होता.   हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेची धांदल उडाली. 62 वर्षीय महिला अनुसया पारधी यांना 11 दिवसांपूर्वी कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस एकाच दिवशी दिले होते. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे.

प्रकृती स्थिर

अनुसया पारधी यांना पहिला डोस दिल्यानंतर दहा मिनिटांच्या अंतराने दुसरा डोस दिला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.

कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर आरोग्य विभाग संबंधित महिलेच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होता. आता 11 दिवस उलटल्यानंतर संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला अजूनही आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील अनुसयाबा केवलचंद पारधी(वय 62) या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत. त्या 11 दिवसापूर्वी कोविशील्ड इंजेक्शनचा पहिला डोस घेण्याकरिता गावातीलच शाळेत गेल्या होत्या. केंद्रावर उपस्थित आरोग्य सेविकेने त्यांना पहिला डोस दिला आणि त्यांना काही वेळ तिथेच थांबण्यास सांगितले. मात्र, 10 मिनिटांनी त्याच महिलेचे नाव घेऊन त्यांना पुन्हा बोलवण्यात आले. दुसरा डोस देखील देण्यात आला. महिलेने घरी जाऊन हा सर्व प्रकार मुलगा विनोद पारधी यांना सांगतिला. विनोद पारधी यानं दोन इंजेक्शन दिल्याचे घाव दिसून आल्याचा दावा केला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं मत काय?

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली असताना या महिलेचा दोनदा लस देण्यात आली नाही. आम्ही याची संपूर्ण माहिती घेतली असून ही अफवा आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे यांनी यांनी दिली होती.

संबंधित बातम्या 

एकाच दिवशी कोव्हिशिल्डचे दोन डोस, महिलेचा आरोप, आरोग्य अधिकारी म्हणतात…

Gondia woman who claimed received two dose of covishield vaccine same time same day now her health condition is stable maharashtra update