St worker strike : याआधी 28 संघटनांनी माघार घेतली ही 29 वी संघटाना, फरक नाही पडत-सदावर्ते

| Updated on: Dec 20, 2021 | 10:03 PM

यापूर्वी 28 युनियनने संपातून माघार घेतली तरी दुखवट्याला काहीही फरक पडला नाही, ही 29 वी युनियन आहे, या युनियनमध्ये माणसे नाहीत, अशी प्रतिक्रिया यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

St worker strike : याआधी 28 संघटनांनी माघार घेतली ही 29 वी संघटाना, फरक नाही पडत-सदावर्ते
GUNARATNA SADAVARTE
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजय गुजर यांनी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र गुजर यांचा निर्णय अमान्य करत एसटी कर्मचाऱ्यांनी दुखवटा चालूच ठेवला आहे. यापूर्वी 28 युनियनने संपातून माघार घेतली तरी दुखवट्याला काहीही फरक पडला नाही, ही 29 वी युनियन आहे, या युनियनमध्ये माणसे नाहीत, अशी प्रतिक्रिया यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

यांना जास्त महत्व देऊ नका

या कष्टकऱ्यांचा दुखवटा आहे. त्यामुळे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वासही सदावर्तेही यांनीही व्यक्त केला आहे. तर शरद पवारांचे राजकारण या ठिकाणी येईल हे आधीच वाटलेले, गुजर हे शरद पवारांच्या याच राजकारणाला बळी पडले असतील अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या संघटनेच्या बळावर दुखवटा सुरू नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या बळावर हा दुखवटा सुरू आहे, कृपाकरून कष्टकऱ्यांना वाईट वाटेल असे, बोलू नये असे आवाहनही सदावर्तेंनी केले आहे.

दोन माणसे गेली म्हणून फरक नाही पडत

राज्यात 250 ठिकाणी कर्मचारी आंदोलन करत आहेत, ही दोन लोक गेली म्हणून दुखवट्याला फरक पडत नाही, गुजर यांनी जिकडे जायचे तिकडे जावे, अशी परखड भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. आझाद मैदानात अजूनही मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. आंदोलनकरर्त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन अशीही प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. तर आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी आमचा सदावर्तेंना पाठिंबा आहे आणि विलीनीकरण होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशीही भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे अजय गुजर यांची भूमिका कर्मचाऱ्यांनी अमान्य करत, कामावर हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 22 तारखेला किती कर्मचारी कामावर हजर राहतात? त्यावरील प्रश्नचिन्ह अजून कायम आहे.

Ola S1 ते Komaki TN95, 2021 मध्ये या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

Chandrakant Patil: भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

ST Workers Strike : अजय गुजर यांच्याकडून संप माघारीची घोषणा, एसटी कर्मचारी म्हणतात आमचा संप नाही तर दुखवटा!