Heatstroke : महाराष्ट्रात उष्माघाताचे 376 रूग्ण, 25 जणांचा संशयित मृत्यू

| Updated on: May 02, 2022 | 10:46 AM

मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे आपण पाहतोय. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय देखील आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त फिरू नये असा डॉक्टरांनी दिला आहे.

Heatstroke : महाराष्ट्रात उष्माघाताचे 376 रूग्ण, 25 जणांचा संशयित मृत्यू
राज्यभरात हवामान कोरडे झाले आहे
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून राज्यातलं तापमान (Temperature) अत्यंत वाढलं आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केल आहे. तसेच अधिक पाणी देखील पिण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात वाढत असलेल्या उष्णतेच्या तडाख्यामुळे आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. साधारण 25 रूग्ण दगावले असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्मघाताचे (Heatstroke) एक मार्च पासून 374 रूग्ण उपचार घेत असल्याचे माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र (Maharashtra)राज्यातल्या विविध जिल्ह्यात पंचवीस जण दगावल्याची नोंद झाली आहे. सध्या उपलब्ध झालेली आकडेवारी ही मागच्या पाच वर्षातील सर्वाधिक आकडेवारी आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रूग्ण

प्राप्त झालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एक मार्चपासून 374 उष्माघाताच्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधीक रूग्ण हे नागपूरमधील असून तिथे 295 रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा              उष्मघाताचे रूग्ण
नागपूर –          295
अकोला –         32
पुणे –               20
नाशिक –            14
औरंगाबाद –       11
लातूर –              1
कोल्हापूर –        1

वरील आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

दुपारी कामाव्यतिरिक्त फिरू नये

मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे आपण पाहतोय. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय देखील आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त फिरू नये असा डॉक्टरांनी दिला आहे. त्याचबरोबर दिवसभरात सुटी कपडे वापरावे. उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी केलं आहे. भारतीय हवामान विभाग आणि राज्याच्या आरोग्य विभागाने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह विविध भागांसाठी पिवळा आणि केशरी इशारा जारी केला आहे.