मुंबईत संध्याकाळी पाच वाजताच अंधार पडला; वातावरण अचानक बदललं आणि….

| Updated on: Sep 07, 2022 | 6:29 PM

मुंबईचे हवामान अचानक बदलले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. घाटकोपर, विक्रोळी, चेंबुर या उप नगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

मुंबईत संध्याकाळी पाच वाजताच अंधार पडला; वातावरण अचानक बदललं आणि....
Follow us on

मुंबई : मुंबईत आज सकाळपासूनच कडक ऊन पडलं होत. दुपारी दोनच्या सुमारास नागरिक गर्मीने हैरान झाले. मात्र, अवघ्या दोन तासाच मुंबईत वातावरण अचानक बदललं. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत अंधार पडला. ढग भरुन आले आणि मुंबईत मुसळधार पाऊस(Heavy rain in Mumbai) सुरु झाला आहे.

मुंबईचे हवामान अचानक बदलले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर या उप नगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे ऑफीसवरुन घरी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

मुंबईसह, ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहेत. कोकणात रायगड रत्नागिरी सह सिंधुदूर्ग जिल्हयातही तुफान पाऊस सुरु आहे.

येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली होती. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार वाढणार असल्याचा अलर्टही देण्यात आला  होता.  अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे.  मुंबईत ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी काळोख पडला आहे.  विजांच्या कडकडाटासह सुरु झाला आहे. वातावरणात  अचानक झालेल्या बदलामुळे मुंबईकर गोंधळेले आहेत.

अनंत चतुर्थदशीला तुफान पाऊस पडणार

7 सप्टेंबरच्या सुमारास पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने हवामानात हा बदल झाला आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4-5 दिवसांसाठी ढगाळ हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच शुक्रवारी अतिमुसळधार पावसाचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.