Breaking | महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा

| Updated on: Jun 08, 2021 | 7:11 PM

महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 11 आणि 12 जूनला कोकणाल ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow us on

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस (Mumbai Rains) बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 11 आणि 12 जूनला कोकणाल ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Heavy rains in Maharashtra for next 4 days, weather department warns)

ठाणे महापालिका सज्ज

हवामान विभागाने मुंबई, कोकणासह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा स्वत: रस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करत आहेत. नुकतंच त्यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. तसेच त्यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत