मोबाईलच्या नादात ती टेरेसवरुन पडली, पण अशी वाचली

| Updated on: Sep 11, 2022 | 11:06 PM

फोनवर बोलता बोलता तिच्या हातातील मोबाईल निसटला. टॅरेसवरु मोबाईल पडून तिस-या मजल्याच्या खिडकीच्या सज्जावर पडला. त्यानंतर ही तरुणी पायाच्या साहय्याने मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचा तोल जावून ती थेट पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या टॅरेस शेडच्या पञ्यावर पडली.

मोबाईलच्या नादात ती टेरेसवरुन पडली, पण अशी वाचली
Follow us on

नालासोपारा: मोबाईलसाठी एका तरुणीने आपला जीव धोक्यात घातल्याची धक्कादायक घटना नालासोपारा(Nalasopara) येथे घडली आहे. मोबाईलमुळे(mobile phone) ही तरुणी टॅरेसवरुन पडली मात्र तिचे नशीब बलवत्तर म्हणून ही मुलगी थोडक्यात बचावली आहे. तिच्या हाताला दुखापत झाली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथील रंजनी अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली आहे. 19 वर्षाची तरुणी यात जखमी झाली आहे. ही तरुणी सोसायटीच्या टॅरेसवर मोबाईलवर बोलत होती.

फोनवर बोलता बोलता तिच्या हातातील मोबाईल निसटला. टॅरेसवरु मोबाईल पडून तिस-या मजल्याच्या खिडकीच्या सज्जावर पडला.
त्यानंतर ही तरुणी पायाच्या साहय्याने मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचा तोल जावून ती थेट पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या टॅरेस शेडच्या पञ्यावर पडली.

हा प्रकार लक्षात येताच इमारतीमधील नागरीक तिच्या मदतीसाठी धावून आले. मात्र, तिची सुटका करता आली नाही. यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.

अखेरीस वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी टॅरेस गॅलेरीच्या ग्रील स्प्रेडर कटरने कापले. तब्बल एका तासानंतर या तरुणीची सुखरुप सुटका झाली.

या घटनेत मुलीच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. माञ सुदैवाने ती वाचली आहे. सध्या तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या उजवा हाताला फॅक्चर झालं आहे. आज सायंकाळी साडे सात वाजता ही घटना घडली आहे.