पालकमंत्र्यांवर भाजप नेत्यांची पाळत ठेवताय ? भाजप आणि शिंदे गटातील नाराजी वाढली ?

| Updated on: Nov 04, 2022 | 7:55 PM

भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे, याच काळात मात्र भाजपचे अनेक नेते नाराज झाले होते.

पालकमंत्र्यांवर भाजप नेत्यांची पाळत ठेवताय ? भाजप आणि शिंदे गटातील नाराजी वाढली ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यापासूनच नाशिकमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाल्यापासून भाजपमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं आहे. त्यातच नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांच्या ऐवजी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजपचे पाचही आमदार नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहेत. त्यातच भाजप आणि बाळसाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गट हे दोन्ही आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असतांना भाजपचे नेते पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर लक्ष ठेऊन असल्याची चर्चा शिंदे गटाच्या वर्तुळात सुरू झाली असून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री म्हणून दादा भुसे आढावा घेत असतांना जिल्हाधिकारी कार्यालय असो वा पालिकेत असो भाजपचे अनेक नेते आणि त्यांचे नातेवाईक बैठकीला हजर राहत आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. बाळसाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे.

भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे, याच काळात मात्र भाजपचे अनेक नेते नाराज झाले होते.

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रबळ दावेदार असतांना शिंदे मुख्यमंत्री कसे काय ? असा नाराजीचा सुर अनेक भाजप नेते लावत होते.

सत्तांतर होऊन जवळपास अडीच महिन्यांनी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि पालकमंत्री पदाची घोषणा झाली, यामध्ये नाशिकचे पालकमंत्री पद भाजपच्या ऐवजी शिंदे गटाच्या वाट्याला गेले.

यावरून मात्र नाशिकच्या भाजप नेत्यांमध्ये आणखीच नाराजी वाढल्याचे दिसून येत होती, अशातच दादा भुसे यांनी बैठकांचे सत्र सुरू केल्याने भाजप आमदारांच्या मध्ये आणखीच नाराजी निर्माण झाली आहे.

नाशिक महानगर पालिकेत सध्या प्रशासक आहे, त्यापूर्वी भाजपची सत्ता होती, 66 नगरसेवक भाजपचे होते, तिथेही भुसे यांनी बैठक घेत आढावा घेणे सुरू केल्याने भाजपच्या नेत्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

इतकंच काय तर दादा भुसे यांच्या कारभारावर भाजप आमदारांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्याची देखील माहिती समोर येत असून भाजप आणि शिंदे गटात वाढती दरी बघायला मिळत आहे.