सोलापुरच्या लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; रिझर्व बँकेची मोठी कारवाई

| Updated on: Sep 22, 2022 | 9:01 PM

लक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेचे 105 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सोलापुरच्या लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; रिझर्व बँकेची मोठी कारवाई
Follow us on

सोलापूर : सोलापुरच्या(Solapur) लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा(Lakshmi Co-operative Bank) परवाना रद्द करण्यात आला आहे. रिझर्व बँकेने ही कारवाई केली आहे. लक्ष्मी बँक आर्थिक अडचणीत आल्याने आरबीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे बँकेचे खातेधार चिंतेत आले आहेत.

आजपासून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत. अनेकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. यामुळे खातेदार अडचणीत आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी बँक आर्थिक अडचणीत आली होती. यावेळी ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. लवकरच ठेवीदारांचे पैसे परत मिळतील असे आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते.

दरम्यान त्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही 94 हजार ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकून पडल्या आहेत.

लक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेचे 105 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

रिझर्व बॅंक ऑफ इंडिया ने लक्ष्मी को-ऑपरेटिव्हबँकेवरती प्रशासक नियुक्त केलेला आहे. या सर्व ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचे समजते.