सप्तशृंगी गडावर नवा वाद उभा राहण्याची शक्यता; ग्रामस्थांनीच देवस्थानाच्या विरोधात थोपटले दंड

| Updated on: Dec 06, 2022 | 8:40 AM

नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून सप्तशृंगी देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण होत असतो, त्यावरून व्यवस्थापनच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सप्तशृंगी गडावर नवा वाद उभा राहण्याची शक्यता; ग्रामस्थांनीच देवस्थानाच्या विरोधात थोपटले दंड
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील हे देवस्थान लाखों भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे सुरक्षा आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, गडावर शिस्त राहावी यासाठी सुरक्षारक्षक भरती करण्यात आली आहे. याशिवाय प्रस्तावित देखील आहे. याच सुरक्षारक्षक भरतीवरुन मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांच्यात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. नुकतेच ग्रामस्थानी संपूर्ण गाव बंद ठेवत देवस्थानचा निषेध केला आहे. भरती प्रक्रियेत किंवा कुठलाही निर्णय घेत असतांना व्यवस्थापन समिती ग्रामस्थांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. एकंदरीतच व्यवस्थापनाच्या कारभारावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. आणि त्याचाच सोमवारी एकत्रित संताप बाहेर आल्याने ग्रामस्थांनी बंद पाळत आंदोलन केले होते. शासकीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्यातील दरी कमी झालेली नाही.

नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून सप्तशृंगी देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण होत असतो, त्यावरून व्यवस्थापनच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनेक भाविकही देवस्थानच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतात, दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना हात धरून बाजूला ढकलणे, दर्शन घेतांना घाई-घाईने ढकलणे असे प्रकार समोर येत आहे.

सुरक्षा रक्षकांची दादागिरी वाढत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहे, भाविकांना दर्शन घेतांना काही क्षणातच ढकलले जात असल्याने भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.

त्यातच याच सुरक्षा रक्षकांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत व्यवस्थापनाच्या विरोधात बंद पाळला होता. त्यामुळे व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांच्यात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

व्यवस्थापनाच्या विरोधात अनेक तक्रारी समोर येत असतांना भरतीप्रक्रियेत स्थानिकांना डावलणे, बाहेरील सुरक्षारक्षकांना वाढीव वेतन देणे असा आरोप होऊ लागल्याने शासकीय पातळीवर हा वाद जाऊन ठेपला आहे.