मॅजिक फिगर महाविकास आघाडीकडं असणार, अमोल मिटकरी यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Nov 04, 2022 | 9:07 PM

राज्याचं नेतृत्व अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीनं करावं असं माझं वैयक्तिक मत आहे.

मॅजिक फिगर महाविकास आघाडीकडं असणार, अमोल मिटकरी यांचा गौप्यस्फोट
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणालेत
Image Credit source: tv 9
Follow us on

शिर्डी : शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, शहाजीबापू हे दिलासादायक असं काही बोलतात. पण, त्याचा फारसा काही परिणाम आहे, असं नाही. जयंत पाटील यांनी सांगितलं की, हे शिबिर आटोपल्यानंत शिंदे सरकार कोसळणार. यामुळं शहाजीबापू यांनी धास्ती घेतली असावी. उद्विग्नतेतून त्यांचं हे वक्तत्व आलेलं आहे, असं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं.

अमोल मिटकरी म्हणाले, शहाजीबापूंनाही माहीत आहे कोण-कोणाच्या संपर्कात आहेत. फक्त पक्षाच्या काही मर्यादा असल्यानं मी गौप्यस्फोट करणार नाही. हे अधिवेशन आटोपू द्या. काही दिवसातचं तुम्हाला मोठी ब्रेकिंग दिसेल. त्यानंतर आपण शहाजीबापूंना विचारू की, तुमच्या सोबतचे किती आमदार अस्वस्थ आहेत.

जयंत पाटील बोलले. त्यानंतर अजित पवार म्हणाले, 145 चा आकडा असल्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही, हे जरी बरोबर असेल. हा मॅजीक फिगर महाविकास आघाडीकडं असणार आहे.

राज्यात फार मोठा बदल होता. आषाढी एकादशीची पूजा महाविकास आघाडीचेचं मुख्यमंत्री करतील, हे पुन्हा सांगतो. फडणवीस सरकारमधील आमदार तसेच बंडखोर आमदार यांनीही हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

संविधानाचा अधिकार आहे. यावर कोणी गदा आणू शकत नाही. गुलाबराव पाटील घाबरलेले आहेत. असे फतवे काढून काही होणार नाही. कितीही जिल्हाबंदी आणली तरीही कोणाचा आवाज दाबू शकता येणार नाही.

उद्याचा दिवस राजकीय दृष्टीनं महत्त्वाचा आहे. राज्याचं नेतृत्व अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीनं केलं करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आषाढीची पूजा अजित पवार यांनी करावी, अशी माझी वैयक्तिक इच्छा असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.