महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
In a way, our Quad will work as a ‘force for global good’. I believe that our cooperation in Quad will ensure peace and prosperity in the Indo-Pacific as well as the entire world: PM Narendra Modi’s opening remarks at Quad Leaders’ Summit pic.twitter.com/IXg9bXI1Sq
— ANI (@ANI) September 24, 2021
जागतिक प्रश्नांवरील उत्तरं शोधण्यासाठी जो बायडेन नेतृत्व करत आहेत. त्याचे नेतृत्व स्तुत्य आहे. अमेरिका तसेच भारत मुख्य आव्हानांना तोंड देण्यासाठी सोबत काम करतील- मोदी
Biden’s leadership on global issues is commendable and India, US would work together to overcome key challenges: PM Modi
Read @ANI Story | https://t.co/c7s5J9mDNl#PMModiUSVisit #PMModi #JoeBiden pic.twitter.com/hIfMPooS9V
— ANI Digital (@ani_digital) September 24, 2021
क्वाड देशांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत.
आपण क्वाड देश 2004 मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो.
सध्या जग कोरोना महामारीतून जात आहे.
अशा परिस्थितीत आपण येथे भेटत आहोत.
आपण मानवजातेच्या कल्याणासाठी येथे पुन्हा एकदा जमलो आहेत.
असे मोदी म्हणाले आहेत.
Our four nations met for the first time after 2004 Tsunami to help the Indo-Pacific region. Today, when the world is fighting against #COVID19 pandemic, we have come here once again as Quad for the welfare of humanity: PM Narendra Modi’s opening remarks at Quad Leaders’ Summit pic.twitter.com/RQwNUQ8V73
— ANI (@ANI) September 24, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड देशांच्या बैठकीत उपस्थित राहिले आहेत.
जो बायडेन यांच्यादेखील उपस्थिती आहे.
तसेच जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन हे बैठकीला उपस्थित आहेत.
ही बैठक 2 तास चर्चा चालणार आहे.
Our four nations met for the first time after 2004 Tsunami to help the Indo-Pacific region. Today, when the world is fighting against #COVID19 pandemic, we have come here once again as Quad for the welfare of humanity: PM Narendra Modi’s opening remarks at Quad Leaders’ Summit pic.twitter.com/RQwNUQ8V73
— ANI (@ANI) September 24, 2021
नेरेंद्र मोदी व्हाईट हाऊसधून बाहेर पडले आहेत.
मोदी आणि बायडेन यांच्यात बैठक झाल्यानंतर मोदी व्हाईट हाऊसच्या बााहेर पडले आहेत.
यानंतर मोदी क्वाड शिखर परिषदेला हजेरी लावतील.
#WATCH | Washington DC: PM Narendra Modi leaves from the White House after his bilateral meeting with US President Joe Biden.
He will attend the first in-person Quad Leaders’ Summit later today. pic.twitter.com/XlNaieG7LC
— ANI (@ANI) September 24, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच जो बायडेन यांच्यात बैठक सुरु झाली आहे. दोन्ही नेत्यांचे शिष्टमंडळदेखील या बैठकीला उपस्थित आहे.
बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची उपस्थिती
The Indian delegation for bilateral meeting with US President Joe Biden led by PM Modi included EAM Dr S Jaishankar, NSA Doval, Foreign Secretary HV Shringla, India’s ambassador to US TS Sandhu, Jt Secy to the PM RG Shresth and Private Secy to the PM Vivek Kumar pic.twitter.com/i14YCnDr6m
— ANI (@ANI) September 24, 2021
मुंबई : यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश
अहमदनगरचा विनायक नरवदे देशात 37 वा
नितिषा जगताप या अवघ्या 21 वर्षांच्या मुलीचं पहिल्याच प्रयत्नात यश
तर अंधत्वावर मात करत पूजा कदम हिने मिळवले यूपीएससीत यश
बीड: सौताडा धबधबा परिसरात ग्रामसेवकाचा मृतदेह आढळला
150 फूट खोल दरीत आढळला मृतदेह
झुंबर गवांदे असं अधिकाऱ्याचं नाव
झुंबर हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीचे अधिकारी
अपघात की आत्महत्या अद्याप अस्पष्ट
पाटोदा पोलीस घटनास्थळी दाखल
जळगाव : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. महापालिका प्रशासन, मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. शेतकरी व पर्यावरणासाठी आवश्यक असलेल्या झाडांची रोपवाटिका त्या त्या जिल्ह्यात तयार झाल्या पाहिजेत. यासोबतच देशी वाणांच्या रोपवाटिकेला प्राधान्य देण्यात यावे, राज्य सरकार उत्तम काम करत असल्याची भावना यावेळी सयाजी शिंदेंनी व्यक्त केली.
बीड: गेवराई तालुक्यातील अमृता नदीवरील पूल वाहून गेला
पूल वाहून गेल्याने मृदेहाची अहवेलना
रस्ताच नसल्याने मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची ओढावली नामुष्की
गेवराईच्या भोजगाव येथील घटना
18 वर्षीय तरुणीने केली होती आत्महत्या
नगर विकास मंत्री व पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यामधील रस्त्याची पाहणी केली यादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री शिंदे यांना टोला लगावला .आमदार पाटील यांनी ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना झापले आता कल्याण शीळ रोड आणि कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची पाहणी करावी. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आमच्यासाठी वेळ काढा. लोक त्रस्त आहेत, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलंय.
आज @mieknathshinde जी आपण ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांना झापले व काम करण्याच्या सुचना दिल्या या बद्दल धन्यवाद.अशीच पाहणी #कल्याण_शीळ व @KDMCOfficial मधील रस्त्यांची पण करावी. आपण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात.जरा आमच्यासाठी पण वेळ काढा,लोक त्रस्त आहेत.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 24, 2021
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
– शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये, आई वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे, 70 ते 75 टक्के जवळच्या लोकांकडून अशा घटना घडत असतात, त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे
– देवेंद्र फडणवीस 100 अजित पवार खिशात घालतील या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मला काहीही बोलायचं नाही. मी फक्त विकासावर बोलेन आणि तुम्ही माध्यमं अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देऊ नका, अशी माझी विनंती
– प्रभाग रचनेबाबत येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, कारण आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलीय
– वॉर्ड रचनेबद्दल वाद होणार नाही, काही काळजी करू नका, ज्यांना कोर्टात जायचे ते जाऊ शकतात
– पण असल्या विषयात मला रस नाही, मला विकास कामाच्या बाबतीत काय विचारायचे ते विचारा, असले प्रश्न विचारू नका
– किरीट सोमय्यांच्या बाबतीत पहिल्या दिवशी घडलं ते चुकीचं घडलं, कुणाला काही पाहणी करायची असेल तर करू द्यावी
– निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात
– कोणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करू, त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटे वाडीत येऊन घेऊ द्या, मला त्यावर काही म्हणायचं नाही
– आज भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले गेले, मी पण त्या विरोधात आहे, शहर बकाल करण्याचा अधिकार नाही
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
भाजप नेते किरीट सोमय्यांनी दोन कारखान्याबाबत आरोप केले
मंगळवारी ते पुन्हा कोल्हापूरला येणार आहेत
माझी सर्वांना विनंती
त्यांना शांततेत येऊ द्यावं
पक्ष बदनाम होईल, असं वागू नका
शांतता बिघडू नये, अशी विधाने त्यांनीही करावीत
त्यांनी दौरा संयमाने करावा
आमच्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी
पण सोबतच भारतीय जनता पक्षाच्या कामाचाही आढावा घ्यावा
शाहू आणि हमीदवाडा कारखान्यात माझं योगदान
मात्र राजकीय परिस्थितीमुळे मला बाजूला व्हावं लागलं
आपल्याला मानणाऱ्या शेतकरी वर्गासाठी खाजगी कारखाना काढावा लागला
याआधी रेड झाली तेव्हा कागदपत्रे दिली आहेत
कारखान्यात एक पैशाचा गैरव्यवहार नाही
ब्रिक्स इंडिया या माझ्या मित्राच्या कंपनीला आप्पासाहेब नलवडे कारखाना चालवायला दिला
तपासणी करणाऱ्या यंत्रणेने या कंपनीचं हार घालून स्वागत केलं पाहिजे
कारण मोठा तोटा सहन करुन त्यांनी कारखाना सुरू ठेवला
सोमय्यांनी आरोप करण्याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती
येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची शाळा सुरु करण्यास मान्यता, कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु राहणार, याबाबत शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठवलेला, त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी
ठाणे-नाशिक रस्त्यांची ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाश शिंदेंकडून पाहणी
एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं
पावसाआधी काम करुनही रस्ते वाहून का गेले?
काम नीट नसेल तर ब्लॅक लिस्ट करा
रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार कोण?
औरंगाबादेत अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा
मोबाईलची अंत्ययात्रा काढत काढला विराट मोर्चा
मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी
नादुरुस्त मोबाईलच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी काढला मोर्चा
शासनाने जिल्हा परिषद मार्फत पुरवले होते मोबाईल
सोलापूर – व्होनसळ येथील युवक ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला
रात्री झालेल्या पावसामुळे भरला होता तुडुंब
भरलेला ओढा पाहण्यासाठी गेला होता होनसळ गावातील
25 वर्षीय लहू शिरसागरचा गेल्या दोन तासापासून सुरू
पोलीस आणि महसूल कर्मचारी घेताहेत लव्हू शिरसागरचा शोध
उत्तर सोलापूर तालुक्यातील व्हनसळ येथील घटना
अमरावती –
वलगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्महत्या प्रकरण
अरुन बाबाराव जवजांळ वय 50 रा. आष्टी असे मृतक आरोपीच नाव
आरोपीने चक्क पोलीस ठाण्यात शर्टच्या साहाय्याने आत्महत्या केल्याने अमरावतीत पुन्हा खळबळ
कामात हयगय केल्या प्रकरणी जोसना सोळंके या स्टेशन डायरी अंमलदार यांचे निलंबन
पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जाधव यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली
पोलीस आयुक्त आरती सिंग यांची कारवाई
2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यास राज्य सरकारची परवानगी
कोव्हीड निर्बंध पाळून घेता येणार ग्रामसभा,
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीस राज्य सरकारची परवानगी,
या आधी कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे ग्रामसभा आयोजित करण्यास परवानगी नव्हती,
मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत ग्रामसभा घेण्यास परवानगी,
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं काढले आदेश
– नाना पटोले यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना मारली मिठी
– आम्ही दोघे मित्र असल्याने मिठी मारल्याची नाना पटोले यांची प्रतिक्रिया
– आगामी स्थानिक संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढणार
– दोनच्या प्रभाग पद्धतीच्या मागणीमुख्यमंत्र्यांना प्रस्ताव
– सरकारने पुनर्विचार करावा
– नाना पटोले यांची मागणी
परभणी
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन
जलसंपदा विभागाच्या आधिकऱ्यांची घेणार बैठक
काही वेळात होणार बैठकीला सुरवात
बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही उपस्थिती
पुणे –
– 2215 कोटींच्या 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकापर्ण सोहळा
– केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा,
– उपमुख्यमंत्री अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार,
सोलापूर – धरणे आंदोलनासाठी जमलेल्या अंगणवाडीसेविकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
धरणे आंदोलन करण्याच्या अगोदरच पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात येणार होते धरणे आंदोलन
नाशिक – नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात
पालकमंत्री छगन भुजबळ, सुहास कांदे बैठकीला उपस्थित
कांदेच्या आरोपा नंतर बैठक वादळी होण्याची शक्यता
कोल्हापूर
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग
मंदिराच्या शिखर स्वच्छते सह रंगरंगोटी च्या कामाला सुरुवात
मंदिराला केली जाणार आकर्षक विद्युत रोषणाई
उत्सवकाळात भाविकांना प्रत्यक्ष दर्शन मिळण्याची शक्यता नाही
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मात्र ऑनलाईन दर्शनाची सोय केली जाणार
समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांची माहिती
जळगाव – कोळशाच्या टंचाई मुळे दिपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 210 मेगावॉट संच बंद
दिपनगर केंद्रात फक्त एक दिवसाचा कोळसा उपलब्ध
एक दिवस कोळसा पुरवठा खंडित झाल्यास होऊ शकतो वीज निर्मितीवर परिणाम
7 दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध असणे अपेक्षित
दिपनगर मधील 3 पैकी एक संच बंद
सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ सहित स्क्रिप्ट पाठवली होती
– भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका निवडणूक
– विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या भेटीगाठी सुरु
– बाबुलखेडा परिसरात आज देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
– कार्यकर्त्यांच्या भेटी आणि निवडणूक तयारी आढावा
अहमदनगर
कोरोनामुळे 1 हजार 689 बालकांनी पालक गमावले तर 24 निराधार,, कोणी आई तर कोणी वडील गमावले,
या बालकांनी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून मदत करण्यासाठी शिक्षण समितीकडून ठराव
आई गमावलेले 105 तर वडील गमावलेल्या बालकांची संख्या 1 हजार 515 तर पूर्ण अनाथ 24
पहिले ते दहावी शिकत असलेल्या बालकांची संख्या 1 हजार 329
तर अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांनी संख्या 360
बारामती : बारामती तालुक्यातील शेतकरी सुखावला…
– अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल झाला मोठा पाऊस..
– यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस..
– उसासह अन्य पिकांना मिळालं जीवदान..
– शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकरी समाधानी..
पुणे :
पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 1 रुपयाप्रमाणे फरक देण्याची घोषणा
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने (कात्रज डेअरी) केली घोषणा
या घोषणेनुसार शेतकऱ्यांना यंदाच्या दिवाळीत ७ कोटी ९० लाख रुपयांच्या फरकाचे वाटप केले जाणार
कोरोना संसर्गाच्या काळातही कात्रज डेअरीला २ कोटी ४९ लाख ४ हजार ३७५ रुपयांचा निव्वळ नफा
दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांची माहिती
पुणे :
पुणे जिल्ह्य़ातील मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावे वगळण्याची जिल्हा प्रशासनासाची मोहीम
त्यानुसार आतापर्यंत ६० हजार ७३२ मतदार मतदार यादीतून ‘बाद’
त्यामध्ये पुणे शहरातील आठ मतदार संघांतील २४ हजार ५३० मतदार असून सर्वाधिक वगळलेले दुबार ७३९४ मतदार खडकवासला मतदार संघातील
जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या ७८ लाख ८७ हजार ८७४
त्यामध्ये जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये १५ जानेवारी २०२१ पर्यंत ८८ हजार ७२४ दुबार मतदार
त्यापैकी ६० हजार ७३२ मतदारांची नावे वगळली
मात्र, अद्यापही २७ हजार ९९२ मतदार दुबार असल्याची जिल्हा निवडणूक शाखेची माहिती
कोल्हापूर
गोकुळ दुध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा
सत्तांतरा नंतरची पहिलीच वार्षिक सभा होणार ऑनलाईन पद्धतीन
ऑनलाईन सभेत सत्ताधारी गटाचा 328 कोटींच्या जागा खरेदीचा प्रस्ताव
प्रस्तावाला विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा विरोध
इतक्या मोठ्या रकमेची खरेदीचा प्रस्ताव ऑनलाइन सभेत का
कोरोना काळात गोकुळ निवडणूक चालली मग ऑफलाईन सभा का नको
महाडिक यांचा सवाल
सत्ताधारी गट अनेक बाबीत दूध उत्पादकांनाची दिशाभूल करत असल्याचा ही केला आरोप
नांदेडमध्ये बैलगाडीसह युवा शेतकरी गेला वाहून, अर्धापुर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथली घटना
आसना नदीला आलेल्या पुरातून मार्ग काढण्याचा प्रयत्न
दोन्ही बैल मृतावस्थेत आढळले
युवा शेतकरी सुदर्शन झुंजारेचा शोध सुरू
रत्नागिरी –
गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला
गेल्या तीन दिवसात दरोरोज सापडतायत शंभऱीच्या घरात कोरोनाचे रुग्ण
गेल्या चौविस तासात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर चिंतेचा विषय
जिल्ह्याचा मृत्यूदर ३.११टक्यांवर, ६९ कोरोना रुग्ण आँक्सिजनवर