राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत, 25 हजार पूरग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात

| Updated on: Jul 29, 2021 | 7:26 PM

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे.

राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत, 25 हजार पूरग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात
MIDCकडून पूरग्रस्तांना भरीव मदत
Follow us on

मुंबई : कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 25 हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. (help from MIDC to flood victims in the state)

ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एमआय़डीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयातून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून 1 हजार राशनचे पाकिटे( 25हजार किलो), 2 हजार पाण्याच्या बाटल्या, 5 हजार 500 बँकेट्स, 5 हजार 500 टॉवेल्स पाठविण्यात आले. तर औरंगाबादमधून 500 अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली.

कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे 25 हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभं असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली.

पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना मदत

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून या संदर्भात बुधवारी राज्य मंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाने सादरीकरण केले.

पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा असे यावेळी ठरले. सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी एसडीआऱएफच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणे सुरु आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

संबंधित बातम्या :

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा? नितेश राणेंचा रोहित पवारांना खोचक टोला

‘बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही’, पूरग्रस्तांच्या मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

help from MIDC to flood victims in the state