Corona Update : कोरोनाच्या आकडेवारीत पुन्हा मोठी वाढ, राज्यात 4004 नवे कोरोना रुग्ण

| Updated on: Jun 19, 2022 | 10:51 PM

राज्यात गेल्या चोवीस तासात 4004 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे प्रशासनाचे धाबे पुन्हा दणाणले आहेत. विशेष करुन शहरांचा धोका सध्या (Corona Test)वाढताना दिसतोय.

Corona Update : कोरोनाच्या आकडेवारीत पुन्हा मोठी वाढ, राज्यात 4004 नवे कोरोना रुग्ण
सावधान! राज्यात आज नवे कोरोना रुग्ण वाढले
Image Credit source: aljazeera.com
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना आकडेवारी (Today Corona Numbers) ही पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून येत होती. मात्र आज पुन्हा कोरोनाने राज्याची (Maharashtra Corona Update) चिंता वाढवली आहे. आज राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पार झाला आहे. त्यामुळे राज्यातली सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. येत्या काही दिवसात ही आकडेवारी वाढतच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात 4004 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे प्रशासनाचे धाबे पुन्हा दणाणले आहेत. विशेष करुन शहरांचा धोका सध्या (Corona Test)वाढताना दिसतोय. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी काही नियमांचं पालन करण्याचं आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कच्या वापरावरही शासन भर देत आहे.

मुंबईतल्या कोरोना आकडेवारीतही मोठी वाढ

काल मुंबईतील कोरोना रुग्णांची सख्या ही काहीशी घटली होती. आज मात्र त्यामध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बीएमसीने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज मुंबईत 2087 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने दिवसेंदिवस मुंबई महानगर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मुंबई पालिका प्रशासनानेही आता कोरोना चाचण्या वाढवण्यावर पुन्हा भर दिला आहे.

देशातला कोरोना रुग्णांचा आकडाही वाढताच

दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यातही मोठी वाढ नोंदवली जात आहे. गेल्या चोवीस तासात देशात 12,899 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आल्याने पुन्हा देशाच्या आरोग्य विभागाच्या चिंतेतही मोठी भर पडली आहे. एका दिवसात 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारीही अस्वस्थ करणारी आहे. देशात सध्यासक्रिय रुग्णांची आकडेवारी 72,474 वर पोहोचली असून भारतामधील येणारी आकडेवारी दिवसेंदिवस धडकी भरवणारीच आहे.

दिल्लीतला कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी चिंता वाढवणारी

राजधानी दिल्लीतलाही कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही, दिल्लीत गेल्या चोवीस तासात 1,530 नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत.

आजची दिल्लीतील कोरोना रुग्णांची आकडेवारी