झोपलेल्या महिलेवर घरात घुसून अतिप्रसंग, आरोपीला बेड्या

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

बुलडाणा: विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलडाण्यातील कुंबेफळ इथं घडली. याप्रकरणी गौतम बावसकर या आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पीडित 25 वर्षीय महिला पीडित महिला दुपारी तिच्या घरी मुलांसह झोपलेली असताना, आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तिचं तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप […]

झोपलेल्या महिलेवर घरात घुसून अतिप्रसंग, आरोपीला बेड्या
Follow us on

बुलडाणा: विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलडाण्यातील कुंबेफळ इथं घडली. याप्रकरणी गौतम बावसकर या आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पीडित 25 वर्षीय महिला पीडित महिला दुपारी तिच्या घरी मुलांसह झोपलेली असताना, आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तिचं तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

यावेळी पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र पीडितेचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली असता, आरोपी तिथून पसार झाला.

याप्रकरणी पीडित महिलेने धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारींवरुन, आरोपी गौतम बावसकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.