आमदार निलेश लंकेंच्या आवाहनाला मोठं यश, तब्बल 30 ग्राम पंचायती बिनविरोध

| Updated on: Jan 15, 2021 | 8:06 PM

त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदार निलेश लंकेंच्या आवाहनाला मोठं यश, तब्बल 30 ग्राम पंचायती बिनविरोध
Follow us on

अहमदनगर : आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केलं होतं. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यांच्या हटके ऑफरनंतर आता अनेक ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat elections) बिनविरोध होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आणखी 10 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 40 ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढणार आहेत. (MLA Nilesh Lanke great success 30 gram panchayats are unopposed for election)

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली होती. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच निलेश लंके यांनी केली होती. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती. त्यामुळे यावर बैठक घेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि शासनाचा खर्च वाचावा म्हणून लंके यांनी ही शक्कल लढवली होती. तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 25 लाखांचा निधी देण्यात येईल, असं लंके यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. यासोबतच, त्यांच्या या निर्णयाची ग्रामस्थ अंमलबजावणीही केल्याचं पाहायला मिळत आहे.

चिमणराव पाटीलही 21 लाख देणार

दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 25 लाखांची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये देण्याची घोषणा केली. (MLA Nilesh Lanke great success 30 gram panchayats are unopposed for election)

निवडणुका बिनविरोध करा, बक्षिस जाहिर करणारे आमदार:

>> निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस (पारनेर,अहमदनगर)
आमदार निधीतून 25 लाखांचा विकास निधी देणार

>> कैलाश पाटील, शिवसेना (कळंब-उस्मानाबाद)
आमदार निधीतून 25 लाख रुपये देणार

>> रत्नाकर गुट्टे, रासप ( गंगाखेड,परभणी)
स्वत:च्या आमदार निधीतून गावांच्या लोकसंख्येनुसार 11 ते 21 लाखांचा निधी देणार

>> अभिमन्यू पवार, भाजप (औसा, लातूर)
आमदार निधी आणि इतर निधीतून 21 लाखांचा निधी देणार

>> चिमणराव पाटील, शिवसेना (पारोळा, जळगाव)
आमदार निधीतून 21 लाख रुपये

>> श्वेता महाले, भाजप (चिखली, बुलढाणा)
आमदार निधीतून 21 लाख रुपये

>> सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस (मावळ)
आमदार निधीतून 11 लाख

>> अभिजित पाटील पंढरपूरचे कारखानदार
स्वत:कडून प्रत्येकी 1 लाख रुपये देणार (MLA Nilesh Lanke great success 30 gram panchayats are unopposed for election)

इतर बातम्या –

गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती


(MLA Nilesh Lanke great success 30 gram panchayats are unopposed for election)