हर घर तिरंगा अभियानातील फोटोंवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, शेवाळेंचा आक्षेप, इक्बाल सिंग चहल यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

| Updated on: Aug 14, 2022 | 3:47 PM

हर घर तिरंगा अभियानातील फोटोंवर शेवाळेंचा आक्षेप, इक्बाल सिंग चहल यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

हर घर तिरंगा अभियानातील फोटोंवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, शेवाळेंचा आक्षेप, इक्बाल सिंग चहल यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Follow us on

मुंबई: यंदा देशभर आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘ हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (National Flag) फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. या योजनेवरून सध्या राज्यात वादंग निर्माण झालाय. मुंबंई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हर घर तिरंगा बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो न वापरल्याने आक्षेप घेण्यात आला होता. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी कारवाईची मागणी केली. त्यावर आता चहल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई महापालिकेने या मोहिमेसाठी लोगो डाउनलोड केला. तसंच प्रचार आणि जागरूकतेसाठी काही साहित्य वापरलं ते सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या जाहिरातीतून घेतलेलं आहे. त्यात जसं दिलं आहे तसंच आम्ही वापरलं असं इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्यात आलेला नाही. त्याच साहित्याचा आम्ही वापर केला. त्यामुळे आक्षेप घेणं योग्य नाही, असं चहल म्हणालेत.

हर घर तिरंगा अभियान

‘हर घर तिरंगा ‘ अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे लक्ष्य निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट करत ‘हर घर तिरंगा’ या मोहीमेबद्दल माहिती दिली होती. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. 1947 साली 22 जुलै रोजी तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला होता, असेही पंतप्रधानांनी नमूद केले होते.

हे सुद्धा वाचा

आज देशभरात तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे, मात्र एक काळ असा होता की प्रत्येक घरात ध्वजारोहण करता येणे शक्य नव्हते. बऱ्याच बदलांनंतर सामान्य जनतेचे घर, ऑफीस, कार्यालये आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करणे शक्य झाले. 2002 मध्ये ध्वजारोहणाच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर सामान्य नागरिकांना हा अधिकार मिळाला. तिरंग्याच्या ध्वजसंहितेतील तरतुदींविषयी जाणून घ्या.

फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2.1 नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी, खासगी जागेत किंवा शैक्षणिक संस्थेत ध्वजारोहणाचा अधिकार आहे. मात्र ध्वजारोहणावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1971 च्या Prevention of Insults to National Honour Act अंतर्गत काही नियम असून त्याचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.