MSRTC : डिसेंबरचे वेतन नाही, एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?

| Updated on: Jan 13, 2023 | 12:11 PM

वेतन न मिळल्यास एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Follow us on

एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप डिसेंबर महिन्याचे वेतन न दिल्याने पुन्हा एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच उद्या म्हणजे १४ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी वेतनावरून आक्रमक झाला असून पुन्हा एकदा एसटी आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. असे असतानाही सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समस्येवर गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर व्यापक बैठक घ्यावी, अन्यथा लढा देण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे.