1-2 नव्हे तब्बल 15 मुलींचा विनयभंग, नवी मुंबईत शिक्षकाला बेड्या, सहावी ते आठवीच्या मुलींशी गैरवर्तन

| Updated on: Feb 27, 2020 | 5:09 PM

महापालिका शाळेत एक दोन नव्हे तर तब्बल 15 पेक्षा अधिक मुलींचा विनयभंग (Navi Mumbai molestation) झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

1-2 नव्हे तब्बल 15 मुलींचा विनयभंग, नवी मुंबईत शिक्षकाला बेड्या, सहावी ते आठवीच्या मुलींशी गैरवर्तन
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी मुंबई : महापालिका शाळेत एक दोन नव्हे तर तब्बल 15 पेक्षा अधिक मुलींचा विनयभंग (Navi Mumbai molestation) झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  धक्कादायक म्हणजे हा विनयभंग कुणी दुसऱ्या-तिसऱ्याने नव्हे तर शिक्षकानेच केल्याचा आरोप आहे. खासगी संगणक शिक्षक गेल्या 2 महिन्यांपासून विनयभंग (Navi Mumbai molestation) करत असल्याचा आरोप आहे.

या नराधम शिक्षकाने सहावी ते आठवीच्या विद्यार्थिनींचा 15 पेक्षा जास्त मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.  याप्रकरणी शिक्षक लोचन परुळेकरला तुर्भे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हा शिक्षक मुलींना संगणक शिकवत असताना अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे. मुलींनी शिक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

शिक्षकानेच हे काळं कृत्य केल्याने परिसरात एकच राग व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या शिक्षकाने आणखी किती विद्यार्थिनींचा विनयभंग केला याची आता चौकशी सुरु आहे.

तुर्भ्यातील महापालिका शाळेत या खासगी संगणक शिक्षकाची संगणक प्रशिक्षणासाठी निवड केली होती. मात्र संगणक शिकविण्याच्या नावाखाली तो मुलींशी लगट करत होता. आता त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.