Aditya Thackarey : हे तर सामूहिक प्रयत्नांचे यश, आदित्य ठाकरेंची पालिका शाळांतील वाढत्या विद्यार्थी संख्येवर प्रतिक्रिया

| Updated on: Feb 06, 2022 | 12:01 AM

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे हे प्रत्येक मुंबईकरांना वाटले पाहिजे या हेतूने आम्ही सर्वजण काम करीत आहोत. या दृष्टिकोनातून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी अतिरिक्त 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Aditya Thackarey : हे तर सामूहिक प्रयत्नांचे यश, आदित्य ठाकरेंची पालिका शाळांतील वाढत्या विद्यार्थी संख्येवर प्रतिक्रिया
हे तर सामूहिक प्रयत्नांचे यश, आदित्य ठाकरेंची पालिका शाळांतील वाढत्या विद्यार्थी संख्येवर प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थी पटसंख्येत यावर्षी 29 हजारांनी झालेली वाढ हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackarey) यांनी केले. जोगेश्वरी (पश्चिम ) च्या प्रतिक्षानगर येथील मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण, जोगेश्वरी (पूर्व) च्या पूनमनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल(Mumbai Public School)मधील बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन, दादर (पश्चिम) च्या भवानीशंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन व महापालिका शाळेतील दहावीमधील सर्वोत्तम पंचवीस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच वरळी सी फेस येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील खगोलशास्त्र लॅबचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी भवानी शंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Aditya Thackeray’s reaction to the increasing number of students in Mumbai Municipal Corporation schools)

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, स्थानिक आमदार रवींद्र वायकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, सभागृह नेता विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, स्थानिक नगरसेविका प्रीती पाटणकर, स्थानिक नगरसेवक अनंत उर्फ बाळा नर, स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी सर्वश्री राजेश कंकाळ, राजू तडवी तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

सामूहिक प्रयत्नांमुळे महापालिका शाळेबाबतचे स्वप्न पूर्ण

कोविडमुळे दोन वर्षापासून आपण सर्वजण ऑनलाईन शिक्षण घेत होतो. मुंबईकरांची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देश, समाज नागरिकाला पुढे नेण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आगामी निवडणुका आहे म्हणून हे काम करीत नसून आम्हाला जे काही मुंबईकरांना चांगले द्यायचे आहे ते आम्ही करून दाखवित असतो. त्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. महापालिका शाळांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी रांग लागली पाहिजे हे जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून येत आहे. हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न

दंतचिकित्सा, मानसिक आरोग्य, करियर कौन्सिल, व्हर्च्युअल क्लासरूम या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे हे प्रत्येक मुंबईकरांना वाटले पाहिजे या हेतूने आम्ही सर्वजण काम करीत आहोत. या दृष्टिकोनातून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी अतिरिक्त 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पब्लिक स्कूल भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम) या शाळेला नुकतीच बोर्डाची मान्यता प्राप्त झाली आहे. तळमजला व इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील संपूर्ण भौतिक सुविधा या केंद्रीय बोर्डाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका व सेवाभावी संस्थांच्या मदतीने करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

सर्व वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम आहे. इमारतीत अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, सर्व खोल्यांना डिजिटल फोटो आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यानंतर वरळी सी फेस येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या खगोलशास्त्र लॅबचे फित कापून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (Aditya Thackeray’s reaction to the increasing number of students in Mumbai Municipal Corporation schools)

इतर बातम्या

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर व्हेटिलेटरवर, तब्बेतीची चिंता! दिग्गजांकडून विचारपूस

भविष्यातील इथेनॉलची गरज लक्षात घेता बांबू रिफायनरी सुरू करण्यात याव्यात, पाशा पटेल यांची मागणी