राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. पत्रकार एस बालकृष्णन यांनी ही याचिका दाखल केली आहे.  राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बालकृष्णन यांनी राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेतला […]

राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. पत्रकार एस बालकृष्णन यांनी ही याचिका दाखल केली आहे.  राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

बालकृष्णन यांनी राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. देशात पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो, असं राज ठाकरे विविध सभांमध्ये सांगत आले आहेत. त्यामुळे बालकृष्णन यांनी त्यांचं हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार असल्याचं म्हटलं आहे.

वाचा –  दोन-तीन महिन्यात पुन्हा पुलवामासारखा हल्ला: राज ठाकरे

राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनी तसेच विविध सभांमध्ये पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला होता.  निवडणुका जिंकण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर एस बालकृष्णन यांनी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. राज ठाकरे हे जबाबदार नेते असून, त्यांची वक्तव्य गांभीर्याने घेतली जातात. त्यामुळे मोदींविरोधातील भाष्य करताना त्यांनी पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल असं म्हणणं हे त्यांचं बेजबाबदार वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी बालकृष्णन यांनी केली होती. मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी अखेर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करुन, राज ठाकरे यांची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या  

दोन-तीन महिन्यात पुन्हा पुलवामासारखा हल्ला: राज ठाकरे  

भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, पण मी वेडा नाही : राज ठाकरे