‘जन्माला आल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे’, मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंच्या वडिलांचं उत्तर

| Updated on: Oct 25, 2021 | 7:19 PM

ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. मलिकांच्या या आरोपांना समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या वडिलांनीही उत्तर दिलंय.

जन्माला आल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंच्या वडिलांचं उत्तर
ज्ञानदेव वानखेडे, समीर वानखेडेंचे वडील
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो आणि काही कागदपत्रंही ट्वीट केले आहेत. त्यावर यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा, असंही मलिक यांनी म्हटलंय. ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. मलिकांच्या या आरोपांना समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या वडिलांनीही उत्तर दिलंय. (Sameer Wankhede’s father reply to Nawab Malik’s conversion allegations)

‘माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही’, असं उत्तर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिलं आहे.

मलिक यांचं ट्विट काय?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” असं ट्वीट करत काही कागदपत्रंही त्यांनी शेअर केली आहेत. समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल मलिक यांनी केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

मलिकांचा आरोप आणि नेमकं प्रकरण काय?

समीर वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असंही मलिक म्हणाले.

समीर दाऊद वानखेडेनी अटक करू नये यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अस म्हटलं. पण एखादा प्रामाणिक अधिकारी असता तर समोर जाऊन चौकशी करा म्हटलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

क्रांती रेडकरचे मलिकांना प्रत्युत्तर

क्रांती रेडकर यांनी ट्विट करून नवाब मलिक यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहे. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचं पहिलं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झालं होतं. 2016मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमचं लग्न हिंदू मॅरेज अॅक्टनुसार 2017मध्ये झालं होतं, असंही क्रांतीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इतर बातम्या :

‘समीर वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी चर्चा, तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु’, गृहमंत्र्यांकडून स्पष्ट

समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?

Sameer Wankhede’s father reply to Nawab Malik’s conversion allegations