बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या अजोय मेहतांना अभय का?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : शासन आणि प्रशासन हे व्यवस्थेचे दोन प्रमुख अंग असतात. निर्णय घेणं हे शासनाचं काम असतं, तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी हे प्रशासनाचं काम आहे. शिवाय आवश्यक असलेल्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर निर्णयाची शिफारस करणं हे प्रशासनाचं काम आहे. पण हा नियम देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबईसाठी लागू होत नाही का? हा प्रश्न […]

बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या अजोय मेहतांना अभय का?
अजोय मेहता
Follow us on

मुंबई : शासन आणि प्रशासन हे व्यवस्थेचे दोन प्रमुख अंग असतात. निर्णय घेणं हे शासनाचं काम असतं, तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी हे प्रशासनाचं काम आहे. शिवाय आवश्यक असलेल्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर निर्णयाची शिफारस करणं हे प्रशासनाचं काम आहे. पण हा नियम देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबईसाठी लागू होत नाही का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारणही तसंच आहे. कारण, बीएमसीचे प्रशासकीय प्रमुख असलेले महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अजून कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रशासकीय प्रमुख या नात्याने ऑडिट झाल्यानंतरही ही दुर्घटना का झाली, किंवा या आडिटला आयुक्तांनी मान्यता का दिली, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आयुक्त सध्या माध्यमांपासून पळ काढत आहेत.

महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचं एक वर्षापूर्वीच ऑडिट झालं होतं. हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तांत्रिकदृष्ट्या या पुलाची जबाबदारी आयुक्त अजोय मेहता आणि अभियांत्रिकी विभागाची आहे. त्यामुळे आयुक्तांना अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

जाणकारांच्या मते, या बाबतीत महापौरांना फक्त आदेश देण्याचे अधिकार असतात. अजोय मेहतांना आयुक्तपदाची जबाबदारी एप्रिल 2015 मध्ये दिली. महापालिकेच्या अखत्यारित एकूण 350 पूल येतात. या सर्व पुलांच्या देखरेखीची आणि डागडुजीची जबाबदारी महापालिकेची आहे. सीएसएमटीजवळ जो पूल कोसळला त्यामध्ये मुख्य अभियांत्रिकी, कार्यकारी अभियांत्रिकी, सहाय्यक अभियांत्रिकी, उप अभियांत्रिकी, कनिष्ठ अभियांत्रिकी या सर्वांची जबाबदारी आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून दराडे नावाचे अभियांत्रिकी आहेत, त्यापूर्वी कोरी नावाचे अभियांत्रिकी होते.

गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 6 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. हा पूल मुंबई महापालिकेचाच असल्याचे महापालिकेने कबूल केले आहे.