डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या फ्लॅटची किंमत तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. हा फ्लॅट मुंबईतील नागपाडा विभागात आहे. विशेष म्हणजे हसीना पारकर यांचा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला आहे. हा दाऊदसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटचा लिलाव सरकारी ऐजन्सी SAFEMA (स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अँक्ट) […]

डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या फ्लॅटची किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. हा फ्लॅट मुंबईतील नागपाडा विभागात आहे. विशेष म्हणजे हसीना पारकर यांचा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला आहे. हा दाऊदसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटचा लिलाव सरकारी ऐजन्सी SAFEMA (स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अँक्ट) कडून करण्यात आला आहे.

या फ्लॅटची मूळ किंमत 1 कोटी 69 लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र लिलावा दरम्यान फ्लॅट 1 कोटी 80 लाख रुपयाला विकला गेला. हा फ्लॅट कुणी विकत घेतलाय त्याचे नाव अजूनही समोर आलेलं नाही. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी इच्छुक लोकांना 28 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती.

हसीना पारकरच्या फ्लॅटच्या विक्रीमध्ये 8 लोकांना वाटणी देण्यात आली आहे. नागपाडा येथील गार्डन अपार्टमेंटमध्ये 600 स्क्वेअर फूटाच्या फ्लॅटमध्ये हसीना राहत होती. 2014 ला हसीनाच्या मृत्यूनंतर दाऊदचा भाऊ इकबाल कासकर या फ्लॅटमध्ये राहत होता. कासकरला याच फ्लॅटमधून 2017 ला मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी अटक केली होती.

सीबीआयने 1993 बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊद इब्राहिमच्या एकूण 10 संपत्ती जप्त केल्या होत्या. सैफी बुरहानी अपलिप्टमेंट ट्रस्टने 2015 मध्ये दाऊदच्या रौनक अफरोज हॉटेलवरही बोली लावली होती. या बोलीमध्ये बालकृष्णन यांनी बाजी मारली. पण पुढील पैसे भरता आले नसल्यामुळे लिलाव अयशस्वी ठरला. तसेच डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा देखील सहभाग यामध्ये होता.