सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

| Updated on: May 31, 2019 | 8:06 AM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेल विभागाने सिलेंडरमधून गॅस चोरी करुन तो ब्लॅक भावाने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकूण आठ आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हे काही नामांकित गॅस कंपनींच्या एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. यामुळे गॅस वितारकाबरोबरच ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांनी केलेलल्या या कारवाईत आरोपी […]

सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेल विभागाने सिलेंडरमधून गॅस चोरी करुन तो ब्लॅक भावाने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकूण आठ आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हे काही नामांकित गॅस कंपनींच्या एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. यामुळे गॅस वितारकाबरोबरच ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई पोलिसांनी केलेलल्या या कारवाईत आरोपी हे गॅस एजन्सीमध्ये कामाला होते. हे आरोपी लोकांना डिलिव्हरी केल्या जाणाऱ्या सिलेंडरमधून एक किंवा दोन किलो गॅस चोरीने काढून घेत होते आणि तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरुन ब्लॅक भावाने बाजारात विकत होते. आरोपी टोळीकडून 77 रिकामी सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, वाळकेश्वर परिसरात गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणारे काही लोक त्या सिलेंडरमधून गॅस काढून तो रिकामा असलेल्या सिलेंडरमध्ये भरुन गरजू लोकांना ब्लॅक भावाने विकत आहेत. हे सर्व करण्यासाठी या टोळीचे लोक पाईपखाली सिलेंडर आणि इतर साहित्य बाळगून होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून एकूण आठ जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या टोळीतल्या लोकांचा समावेश आहे. हे आरोपी जवळपास 10 ते 12 गॅस सिलिंडर मधून गॅस चोरायचे आणि एक रिकामा सिलेंडर पूर्ण भरुन ब्लॅक भावाने म्हणजेच 700 ते 800 रुपया दरम्यान गरजेनुसार विकायचे.

या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक आरोपी विविध गॅस कंपनीच्या एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर डिलिव्हरी करण्याचे काम करत असल्याचेही उघड झालं आहे. मात्र या टोळीमध्ये आणखी किती जण आहेत किंवा या संपूर्ण रॅकेटमध्ये कुठल्या एजन्सीच्या मालक, संचालकाचा सहभाग आहे की नाही याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे तुमच्या घरात येणारा गॅस हा पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत येतो का हे पाहण महत्वाचं आहे.