अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग

| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

अजय शर्मा, टीव्ही 9 मराठी, ठाणे : अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसी भागात केमिकल कंपनीला आग लागली. प्रिशिया असे केमिकल कंपनीचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. या आगीचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. प्रिशिया केमिकल कंपनी सुरु असताना अचानक आग लागल्याने कामगारांचा मोठा गोंधळ उडाला होता. प्रसंगावधान राखत कंपनीतील कामगार बाहेर पडले. मात्र काही कामगार जखमी झाले […]

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग
Follow us on

अजय शर्मा, टीव्ही 9 मराठी, ठाणे : अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसी भागात केमिकल कंपनीला आग लागली. प्रिशिया असे केमिकल कंपनीचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. या आगीचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला.

प्रिशिया केमिकल कंपनी सुरु असताना अचानक आग लागल्याने कामगारांचा मोठा गोंधळ उडाला होता. प्रसंगावधान राखत कंपनीतील कामगार बाहेर पडले. मात्र काही कामगार जखमी झाले आहेत. मंगलेश भारती, सरोज कुमार पांडा, रमेश चांदोलकर अशी जखमींची नवे आहेत.

प्रशिया या केमिकल कंपनीत परफ्युम बनवण्यासाठी लागणारे केमिकल बनते. या कंपनीत केमिकलने भरलेले ड्रम असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले होते. कंपनीत अनेक केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाल्याने आग खूप पसरली होती.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या तब्बल 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आता आग नियंत्रणात आली असून, कुलिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.