मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन निघालेल्या सर्व गाड्या गंतव्य ठिकाणी 10 मिनिटे उशिरा पोहचतील. माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.20 ते 3.50 यावेळेत मेगाब्लॉक असेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे येथे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते […]

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई : आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन निघालेल्या सर्व गाड्या गंतव्य ठिकाणी 10 मिनिटे उशिरा पोहचतील. माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.20 ते 3.50 यावेळेत मेगाब्लॉक असेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे येथे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगॉब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक घेण्यात आला नाही.

हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी/ वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप या स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा रोड ते वाशी/ बेलापूर/ पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन वांद्रे/ गोरेगावला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडेल.

मध्ये रेल्वे मार्गावर सकाळी 11.20 ते संध्याकाळी 3.50 यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड या दरम्यान ब्लॉक असेल. तर विद्यविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात एकही लोकल थांबणार नाहीत. माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद लोकल सेवा सुरु असेल. कर्जत-खोपोली दरम्यान अपग्रेड ब्लॉक असेल. सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.