मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (28 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द अप-डाऊन असे दोन्ही मार्ग आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते अंधेरी धिम्या […]

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Follow us on

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (28 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द अप-डाऊन असे दोन्ही मार्ग आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते अंधेरी धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.15 वा. ते दुपारी 3.45 वा. हा ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप-जलद दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते पनवेल, वाशी आणि बेलापूर दरम्यानच्या सर्व लोकल गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.45 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे सांताक्रुझ ते बोरिवली दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.