Mira Road Leopard : काशीमीरा परिसरात रहिवासी वस्तीजवळ बिबट्या आढळ्यानं खळबळ, पाहा Video

| Updated on: Nov 10, 2022 | 10:14 AM

आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत होतीच, आता काशीमीरामध्ये राहणारी लोकंही भयभीत

Mira Road Leopard : काशीमीरा परिसरात रहिवासी वस्तीजवळ बिबट्या आढळ्यानं खळबळ, पाहा Video
बिबट्याची दहशत
Image Credit source: Twitter Video Grab
Follow us on

मीरा रोड : काशीमीरा (Kashimira) परिसरात रहिवासी वस्तीजवळ बिबट्या (Mira road Leopard) आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. रहिवासी वस्तीजवळील असलेल्या एका झाडावर बिबट्या (Leopard News) बसलेला असल्याचं दिसून आलं. काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याची छबी कैदही केलीय. बिबट्याचा व्हिडीओ समोर आल्यानं परिसरात एकच घबराट पसरलीय.

काशीमीरा येथील महाजनवाडी रहिवासी वस्तीजवळ असलेल्या जंगलात झाडावर बिबट्या बसलेला होता. काही संशय आल्यानं त्यांनी वर पाहिलं आणि बिबट्याला पाहून एकच घाबरगुंडी उडाली. यावेळी काही जणांनी मोबाईल कॅमेऱ्यात झाडावर चढलेल्या बिबट्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

रहिवासी वस्तीपासून जवळच असलेल्या जंगलाच्या झाडावर बिबट्या दिसल्यानं आता लोक भयभीत झालेत. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते आहे. याआधीही काशीमीरा आणि घोडबंदर भागात बिबट्या दिसून आल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीत बिबट्यानं एका चिमुरडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या दीड वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेला होता. त्यानंतर आरे कॉलनीत एका बिबट्याला जेरबंदही करण्यात आलं होतं.

बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानंतर दिलासा व्यक्त केला जात असताना आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे जेरबंद झालेला बिबट्या आणि हल्ला करणारा बिबट्या वेगवेगळा होता, असंही बोललं जात होतं.

आरे कॉलनीसोबत आता काशीमीरामध्ये रहिवासी वस्तीजवळ बिबट्याच्या वावरामुळे वन विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोकांकडून केली जाते आहे. शहरांतील नागरीवस्तीत बिबट्याचा वाढता वावर चिंता वाढवणारा आहे. अशा स्थितीत आता वन विभागाकडून काय पावलं उचलली जातात, हे पाहणंही महत्त्वाचंय.