मुंबई लोकलसाठी मनसे इरेला पेटली, थेट हायकोर्टात हस्तक्षेप याचिका

| Updated on: Aug 04, 2021 | 6:47 PM

मुंबई लोकल (Mumbai Local ) प्रवासाबाबत मनसेने (MNS) उच्च न्यायालयात (Bombay High court) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

मुंबई लोकलसाठी मनसे इरेला पेटली, थेट हायकोर्टात हस्तक्षेप याचिका
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) प्रवासाबाबत मनसेने (MNS) उच्च न्यायालयात (Bombay High court) हस्तक्षेप याचिका () दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे. या याचिकेवर आता उद्या 5 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

मनसेने आपल्या याचिकेत दोन लस घेतलेल्या सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रातील निर्बंध शिथील केले आहेत. राज्य सरकारने 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले आहेत, तर 11 जिल्ह्यांतील निर्बंध नियम जैसे थे ठेवले आहेत. मात्र मुंबई लोकलबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.

अशा परिस्थितीत मनसेने सातत्याने दोन डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करु देण्याची मागणी केली होती.

संदीप देशपांडेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र 

सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी लगावला. मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्यास सर्वसामान्य जनतेला अद्यापही परवानगी न दिल्यावरुन देशपांडेंनी ठाकरे सरकारला ट्विटरवरुन चिमटे काढले.

मनसेचा रेलभरो आंदोलनाचा इशारा

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या  

आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल : संदीप देशपांडे

‘ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….’; मनसेने पुढचा पर्याय सांगितला!