मुंबईतल्या प्राईम मॉलला भीषण आग, दोनजण होरपळले; एकाची प्रकृती चिंताजनक

| Updated on: Nov 19, 2021 | 5:32 PM

विलेपार्ले येथे प्राईम मॉलला आज सकाळी भीषण आग लागली होती. तब्बल पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दोनजण होरपळले आहेत.

मुंबईतल्या प्राईम मॉलला भीषण आग, दोनजण होरपळले; एकाची प्रकृती चिंताजनक
Mumbai Fire
Follow us on

मुंबई: विलेपार्ले येथे प्राईम मॉलला आज सकाळी भीषण आग लागली होती. तब्बल पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दोनजण होरपळले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी 10 वाजून 28 मिनिटांनी विलेपार्ले येथील सोसायटी रोडवरील इर्ला येथे प्राईम मॉलला भीषण आग लागली. तळमजला अधिक तीन मजली या इमारतीला लागलेली ही आग अत्यंत भीषण होती. आगीने भराभर पेट घेतल्याने धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली होती.

फायरमन जखमी

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. या आगीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुब्बसीर मोहम्मद असं या जखमी तरुणाचं नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तर आग विझवण्याचं काम करत असताना अग्निशमन दलाचे जवान मंगेश दिनकर गांवकर हे जखमी झाले आहेत. त्यांना किरकोळ मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं.

नवी मुंबईत भीषण आग

दरम्यान, नवी मुंबई येथई एपीएमसीमधईल मर्चंट चेंबर इमारतीतील एका इलेक्ट्रिक दुकानाला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. अचानकपणे आग लागल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मर्चंट चेंबर या इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. आग भडकल्यामुळे ही दुकानेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं. ही आग अधिक भडकून धुराचे लोटही निघत होते. यामुळे संपूर्ण इमारतीमधील नागरिकांनी बाहेर धाव घेतली होती. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाकीच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले जात होतं. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आग घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

 

संबंधित बातम्या:

Farm Laws : पंतप्रधान मोदींनी त्या 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मागावी- संजय राऊत

धग कायम ! अकोल्यातील अकोटमध्ये संचारबंदीत वाढ, 21 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद

Nashik| आणखी एका ST कर्मचाऱ्याची आत्महत्या; कमी पगारामुळे उचलले टोकाचे पाऊल!