मुंबईकरांचे आज मेगाहाल, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेच्या कल्याण ते दिवा, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेट आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यानही मेगाब्लॉक घेण्यात […]

मुंबईकरांचे आज मेगाहाल, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेच्या कल्याण ते दिवा, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेट आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यानही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला स्थानकावर विशेष लोकल धावतील.

मध्ये रेल्वेच्या कल्याण ते दिवा मार्गावर सकाळी 11.45 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी  ब्लॉक दरम्यान कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान लोकल जलद मार्गावरुन धावतील. विशेष म्हणजे सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या सर्व मेल एक्स्प्रेस या 30 मिनिटे उशिराने पोहोचतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.  सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावरही विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे आणि सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत वांद्रे, चुनाभट्टीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 पर्यंत आणि वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 दरम्यान रद्द केल्या जातील.