Corona Update : आता बुस्टर डोस सहा महिन्यांनी घ्या, राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाची मंजुरी

| Updated on: Jun 17, 2022 | 9:48 AM

सध्या ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग देशात वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी चौथ्या लाटेचे संकेत असल्याचं म्हटलं आहे. दररोज आकडा वाढत असल्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहे.

Corona Update : आता बुस्टर डोस सहा महिन्यांनी घ्या, राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाची मंजुरी
शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – राज्यातल्या अनेक जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढायला लागल्यापासून आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. कोरोनीची दुसरी लस (Second Dose) घेतल्यानंतर बुस्टर डोस घेण्यासाठी नऊ महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. परंतु आता सहा महिन्यांनी कोरोनाचा दुसरा देण्याचा निर्णय राष्ट्रीय लस्सीकरण तांत्रिक सल्लागार गटाने घेतला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्र्यांनी बुस्टर डोसचं मधील अंतर कमी करावं अशी मागणी केली होती.

चौथ्या लाटेचे संकेत

सध्या ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग देशात वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी चौथ्या लाटेचे संकेत असल्याचं म्हटलं आहे. दररोज आकडा वाढत असल्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहे. लहान मुलांना देखील लसीकरण करण्यात आलं आहे. बुस्टर डोस मधील अंतर कमी करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयकडे लवकरचं शिफारस केली जाणार असून त्यांची अंमलबजावणी देशात करण्यात येणार आहे.

दोन हजारांच्या संख्येने कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे

मुंबई रोज दोन हजारांच्या संख्येने कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. सरकारी रूग्णालयासह काही कोरोना बाधित रूग्ण खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. अनेक रूग्णालयामध्ये कोरोनासाठी वेगळे बेड तयार करण्यात आले आहेत. विशेष खासगी रूग्णालयात ३० ते ४० रूग्ण उपचार घेत आहे. तर सरकारी रूग्णालयात 516 रूग्णांवरती उपचार सुरू आहेत. अनेक रूग्णालयात कोरोनाच्या चाचणीचं प्रमाण देखील वाढवलं आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या कसल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत आहेत. पण सध्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत नाहीत. कोरोना वाढत असला तरीही राज्यात निर्बंध नाही. तसेच शाळा बंद होणार नाही, किंवा शाळेवर कुठलेही निर्बंध आणण्याचा अद्याप विचार नाही. विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये मुलांचं लसीकरण वाढवणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कोरोना वाढतोय त्यामुळे लोकांनी काळजी घेणं गरजेचं असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.