आता टोलही महागला…! कोणत्या महामार्गावर मोजावी लागणार अधिकची रक्कम..?

| Updated on: Sep 15, 2022 | 6:00 PM

मुंबई-पुणे या एक्सप्रेसवर सध्या 195 रुपये असा टोल आकारला जात आहे. शिवाय या मार्गावर वाहनधारकांची संख्याही अधिक आहे. असे असतानाच आता 1 एप्रिलपासून 18 टक्के टोलमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना 195 रुपयांवरुन 203 रुपये मोजावे लागणार आहेत.

आता टोलही महागला...! कोणत्या महामार्गावर मोजावी लागणार अधिकची रक्कम..?
मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.
Follow us on

मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या (Inflation) महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दरही गगणाला भिडत आहे. यावरुन सरकारवर टीकास्त्र होत असतानाच आता वाहतूक दारांनाही या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कारण 1 एप्रिल पासून (Mumbai_Pune) मुंबई-पुणे महामार्गावरील (Toll) टोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. 18 टक्क्यांनी हा टोल महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, 1 एप्रिलपासून हा टोल वाढवला जाणार असल्याने दरम्यानच्या काळात यामध्ये बदल होईल का हे देखील पहावे लागणार आहे.

195 रुपयांवरुन टोल 203 रुपयांवर

मुंबई-पुणे या एक्सप्रेसवर सध्या 195 रुपये असा टोल आकारला जात आहे. शिवाय या मार्गावर वाहनधारकांची संख्याही अधिक आहे. असे असतानाच आता 1 एप्रिलपासून 18 टक्के टोलमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना 195 रुपयांवरुन 203 रुपये मोजावे लागणार आहेत.

वाहनधारकांच्या खिशाला झळ

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ये-जा करणारेही अधिक आहेत. अशातच आता टोलमध्ये वाढ होणार असल्याने जाण्यागणीस 8 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत.

 प्रत्येक तीन वर्षांनी ही वाढ ठरलेली आहे

यापूर्वी  1 एप्रिल 2020मध्ये अशीच वाढ झाली होती. 2030 पर्यंत प्रत्येक तीन वर्षाला ही दरवाढ करण्याचं अद्यादेशात ठरलेलं आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2023 पासून टोलचे नवे दर लागू होण्याची शक्यता