NSS : राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद

| Updated on: Mar 15, 2022 | 11:18 PM

राज्य आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी 250 रुपये मिळत होते. त्यात वाढ होऊन 400 रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी 450 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 700 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती अंकित प्रभू यांनी दिली.

NSS : राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद
राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद
Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजने (National Service Scheme)साठी 7 कोटी रुपयांची तरतूद केली असून यामुळे राज्यातील सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी वाढीव निधीची मागणी केली होती. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 7 कोटी रुपये वाढीव तरतूद झाली असल्याची माहिती, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांनी दिली. (Provision of Rs. 7 crore in the budget for National Service Scheme)

अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची वाढीव तरतूद

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारडे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी निधीची मागणी केली होती. मंत्री सामंत यांच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारनेही राष्ट्रीय सेवा योजनेसाठीच्या निधीतही वाढ केली. ही बाब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांच्या लक्ष्यात आणून दिली. तसेच आपणही निधी वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी कोणताही विलंब न करता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली. सामंत साहेबांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडूनही राष्ट्रीय सेवा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आम्ही मंत्री महोदय सामंत साहेबांचे आभारी आहोत, असे श्री प्रभू यांनी सांगितले.

अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार

राज्य आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी 250 रुपये मिळत होते. त्यात वाढ होऊन 400 रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी 450 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 700 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती अंकित प्रभू यांनी दिली. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अंकित प्रभु यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. (Provision of Rs. 7 crore in the budget for National Service Scheme)

इतर बातम्या

Video : ‘आई-बापावर बोलायचं नाही…’, लोकसभेत सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांना सुनावले खडेबोल

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पुन्हा रखडणार, ठाकरे सरकारचा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला!